पुणे : बेपत्ता मुलीच्या शोधासाठी एरवी पोलीस सर्वसाधारणपणे तपास करतात. या प्रकरणात मात्र एका गरीब घरातील मुलीचा शोध घेताना पोलिसी नजरेला हे प्रकरण वेगळेच असल्याचे लगेच लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सर्व लक्ष या तपासावर केंद्रित करून सामूहिक अत्याचाराचा प्रकार समोर आणला. एवढेच नव्हे तर त्यातील प्रमुख आरोपी ५ रिक्षाचालक आणि २ रेल्वे कर्मचाऱ्यांनाही तातडीने अटक केली.
काही दिवसांपूर्वीच जनता वसाहतीमध्येही एका २५ वर्षांच्या विशेष मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करण्याचा प्रकार घडला होता. या वेळी शेजारी राहणाऱ्या महिलांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करून या नराधमांना अटक केली होती. ही घटना २७ ऑगस्ट रोजी घडली होती. काही दिवसांपूर्वीही पिंपरी-चिंचवड मध्येही एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यात अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते.
चौकट
निषेधार्ह घटना
“बेपत्ता मुलीचा शोध घेत असताना तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याची घटना समोर आल्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत ८ जणांना अटक केली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी ५ जणांचा शोध घेतला जात आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यात ३७६, पोस्को कलमांचा समावेश करण्यात आला आहे.”
-नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त, पुणे
..........