श्री काळभैरवनाथ परिवर्तनची दुसऱ्यांदा सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:43+5:302021-01-20T04:13:43+5:30
नायगाव ग्रामपंचायतींच्या ११ जागांपैकी १० जागांवर निवडणूक झाली होती. नायगाव ग्रामपंचायतीची प्रभाग तीनमधील एक जागेवर राजेंद्र रतन चौधरी यांच्या ...
नायगाव ग्रामपंचायतींच्या ११ जागांपैकी १० जागांवर निवडणूक झाली होती. नायगाव ग्रामपंचायतीची प्रभाग तीनमधील एक जागेवर राजेंद्र रतन चौधरी यांच्या श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेलचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरीत १० जागांवर सोरतापवाडीचे माजी सरपंच सागर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली स्व. हनुमंत अण्णा चौधरी काळभैरवनाथ पॅनेल व राजेंद्र रतन चौधरी यांच्या श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली.
या लढतीत प्रभाग १, ३ व ४ मध्ये सर्व सात जागा श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेलने जिंकल्या तर उर्वरीत प्रभाग क्र. २ मधील सर्व तीन जागा स्व. हनुमंत अण्णा चौधरी यांच्या श्री काळभैरवनाथ पॅनेलने जिंकल्या.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : प्रभाग १ - जितेंद्र पांडुरंग चौधरी, अश्विनी योगेश चौधरी व दत्तात्रय गणपत बारवकर (परिवर्तन पॅनेल). प्रभाग क्र २ - आरती अमोल चौधरी, बाळासाहेब गायकवाड, प्रियंका गायकवाड (स्व. हनुमंत अण्णा चौधरी पॅनेल).
प्रभाग क्र. ३ - उत्तम नाना शेलार, संगीता रघुनंदन शेलार, कल्याणी संदीप हगवणे - बिनविरोध (परिवर्तन पॅनेल ). प्रभाग क्र. - गणेश गुलाब चौधरी, पल्लवी नवनाथ गायकवाड (परिवर्तन पॅनेल )