कोंढावळे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा योजनेतंर्गत संलग्न एकता महिला स्वयंसहायता शेतकरी गटाच्या वतीने विकेल ते पिकेल अभियानातंर्गत संतशिरोमणी सावता माळी रयत बाजाराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या रयत बाजाराचे उद्घाटन खैरनार यांचे हस्ते करण्यात आले .
खैरनार म्हणाले, कोंढावळे व परिसरातील गावे ताम्हिणी अभयारण्यासारख्या पर्यटन केंद्राच्या परिसरात आहेत. शहरी भागातील लोकांच्या आकर्षणाचे केंद्र हे ठिकाणे आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. त्यांच्यासाठी हा उपक्रम लाभदायक आहे. तसेच शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळणार आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.
सुदर्शन कंपनीच्या सीएसआर अधिकारी वैशाली मुळे यांनी शेतकरी गटाच्या शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार केलेला सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणीकरण तसेच शेतमालाचे ब्रॅडिंग व पॅकेजिंग साहित्य कंपनीमार्फत देण्याचे आश्वासन दिले.
या रयत बाजाराचे उद्घाटनाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी के. एम. हसरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी आर. एन. कोतकर, कृषी पर्यवेक्षक जी. एस. जाधव व कृषी सहायक एन. एस. मालोरे, एस. बी. कंदगुळे तसेच एकता महिला स्वयंसहायता शेतकरी गटाच्या अध्यक्षा अलका कंधारे व गटातील महिला सदस्य उपस्थित होत्या.
-------------------------------