धोम-बलकवडी कालव्यात पडून वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 07:08 PM2018-03-03T19:08:48+5:302018-03-03T19:08:48+5:30
विसगाव खोयातील पोळवाडी (ता. भोर) येथील दिलीप विठोबा पोळ (वय ५५) हे धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात कपडे धुण्यासाठी गेले असताना पाय घसरून कालव्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
नेरे : विसगाव खोयातील पोळवाडी (ता. भोर) येथील दिलीप विठोबा पोळ (वय ५५) हे धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात कपडे धुण्यासाठी गेले असताना पाय घसरून कालव्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
धोम-बलकवडी धरणाचा डावा कालवा पोळवाडी गावाजवळून गेला आहे. या कालव्यावर पोळ हे कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुताना त्यांचा पाय घसरल्याने त्यांचा तोल जाऊन त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद रवींद्र दिलीप पोळ यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली आहे. पोळवाडी, जेधेवाडी येथील सरपंच, तरुण, ग्रामस्थ यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला . तसेच जलसंपदा विभागाशी संपर्क साधून पाणी बंद करण्यास सांगितले. मात्र, रात्र झाल्याने शोधण्यात अडथळा येत होता. तब्बल १८ तासांनंतर शनिवारी सकाळी मिरजेवाडी, ता.खंडाळा येथे त्यांचा मृतदेह आढळला.