तरुणीचा असा मृत्यू होतो ही गंभीर बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:11 AM2021-02-15T04:11:26+5:302021-02-15T04:11:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूजा चव्हाणचा मृत्यू संशयास्पद आहे. तरुणीचा असा मृत्यू होतो ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे ...

This is a serious matter | तरुणीचा असा मृत्यू होतो ही गंभीर बाब

तरुणीचा असा मृत्यू होतो ही गंभीर बाब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पूजा चव्हाणचा मृत्यू संशयास्पद आहे. तरुणीचा असा मृत्यू होतो ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे वक्तव्य विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. दरम्यान भाजपमधले असे १० मंत्री आपल्याला माहीत आहेत जे बिनदिक्कत म्हणतात की आपण दोन बायका करणारच असे म्हणत त्यांनी भाजपवर पलटवारही केला आहे.

पुण्यामध्ये आत पूजा चव्हाण प्रकरणी निलम गोऱ्हेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की “पूजा चव्हाण प्रकरणी निष्पक्षपाती, सखोल चौकशी होईल कुणाला ही पाठीशी घातले जाणार नाही अशी ग्वाही स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिलीय. दोषी असेल तर पाठीशी घातले जाणार नाही. मात्र राजकीय भांडवल करून एखाद्याला राजकारणातून उठवायचे असेल तर ते सहन करणार नाही असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.”

दरम्यान जर इतका कळवळा असेल तर पूजाच्या कुटुंबीयांना भेटायला कोणी का गेले नाही असा सवालही त्यांनी विचारला. याबरोबरच “भाजपचे किमान १० मंत्री मला माहित आहे जे उघडपणे म्हणतात की मी दोन बायका करणारच.”

धनंजय मुंडे प्रकरणाबाबत त्या म्हणाल्या ज्यानी आधी तक्रार केली नंतर त्यांनी वेगळं वक्तव्य केले. राजकीय भांडवल किंवा एखाद्याला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे आरोप होऊ नयेत, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

तसेच पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेला निष्कर्ष काढण्यासाठी वेळ द्यायला हवा.पूजा चव्हाण प्रकरणी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यांचीही सखोल चौकशी होईल, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: This is a serious matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.