सात आरोपींच्या जन्मठेपेची शिक्षा 22 वर्षांनी रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 03:42 PM2019-12-12T15:42:41+5:302019-12-12T15:45:47+5:30

कुत्रे भुंकले या कारणातून झाला होता खून

Seven person Life Imprisonment 22 years jail cancelled by court | सात आरोपींच्या जन्मठेपेची शिक्षा 22 वर्षांनी रद्द 

सात आरोपींच्या जन्मठेपेची शिक्षा 22 वर्षांनी रद्द 

googlenewsNext
ठळक मुद्दे सर्व आरोपींची निर्दोष मुक्ततापोलिसांनी सदर केलेला पुरावा हा पुरेसा नाही

पुणे : कुत्रे भुंकण्याच्या कारणावरुन मारहाणीत झालेल्या एकाच्या मृत्युप्रकरणी सत्र न्यायालयाने सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र तब्बल 22 वर्षानंतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. तसेच घटनेतील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.  
बारकू चंदर जगताप (वय 34), श्रीकांत खंडू माकर (वय 41), दत्तू सावळा भालेराव (वय 59), श्रीरंग दत्तू भालेराव (वय 29), निवृत्ती संतू यादव (वय 59), लहू दत्तू भालेराव (वय 26) आणि गेणभाऊ लक्ष्मण साठे (वय 32, सर्व रा. खुळे मुळशी) यांची सुटका करण्यात आली. 1993 साली बिरा कासकर व त्याचे नातेवाईक हे आपल्या कुटुंबासह खुळे येथे मुक्कामास आले होते. घटनेच्या दिवशी बारकू जगताप हा रस्त्याने जात असताना त्याच्या अंगावर कुत्रे भुंकले. त्यामुळे त्याने कुत्र्याला लाथ मारली व कासकर यांच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली व जगताप याने परिसरातील लोकांना घेऊन येतो, अशी धमकी कासकर कुटुंबीयांनी दिली. त्यानंतर जगताप हा इतर आरोपींना घेऊन आला. सर्वांनी मिळून बिरा व त्याच्या नातेवाइकांना बेदम मारहाण केली. त्यात बिरा यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी सातही आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध, बेकायदा जमाव जमवून खून केल्याबाबतचे दोषारोपपत्र येथील सत्र न्यायालयात दाखल केले. 1997 साली त्याची सुनावणी झाली. सर्व आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. 
..................
* पोलिसांनी सदर केलेला पुरावा हा पुरेसा नाही. आरोपीची ओळखपरेड न घेणे, साक्षीदारांच्या जबाबात असलेल्या विसंगती व तपासातील त्रुटी बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. आरोपीचा बचाव मान्य करून, न्यायालयाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा देऊन त्यांची जन्मठेप रद्द बातल ठरविली. 22 वर्षांनंतर त्यांची निर्दोष मुक्तता केली. पुणे सत्र न्यायालयाचा निकाल हा चुकीच्या निष्कर्षावर असून आरोपींच्या विरुद्ध काहीही पुरावा नसल्याचा बचाव आरोपींच्या वतीने अ‍ॅड. दीपक गिरमे, अ‍ॅड. नितीन देशपांडे आणि अ‍ॅड. सिद्दार्थ चपळगावकर यांनी केला. या अपिलाची सुनावणी न्यायाधीश एस. एस. शिंदे व नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर झाली.

Web Title: Seven person Life Imprisonment 22 years jail cancelled by court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.