शिवणे- उत्तमनगर भागात दवाखान्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:09+5:302021-04-12T04:09:09+5:30

नगरे हॉस्पिटलचे डॉक्टर नवनाथ नगरे ह्यांनी दिलेल्या महितीनुसार त्यांच्या दवाखान्यात एकूण १५ बेडची व्यवस्था असून, त्यामध्ये १४ ऑक्सिजन बेड ...

Sewing- Lack of oxygen in the hospital in Uttamnagar area | शिवणे- उत्तमनगर भागात दवाखान्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

शिवणे- उत्तमनगर भागात दवाखान्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

Next

नगरे हॉस्पिटलचे डॉक्टर नवनाथ नगरे ह्यांनी दिलेल्या महितीनुसार त्यांच्या दवाखान्यात एकूण १५ बेडची व्यवस्था असून, त्यामध्ये १४ ऑक्सिजन बेड आहेत. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे फक्त ३ रुग्ण इलाज घेत आहेत आणि १२ बेड ऑक्सिजनअभावी मोकळे आहेत.

संजीवनी हॉस्पिटलमध्ये देखील २० बेडची व्यवस्था असून, १८ बेडवर ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहे आणि सर्वच बेडवर रुग्ण इलाज घेत आहेत. परंतु इथेही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.

मिनर्वा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नीलेश भेगडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार : तेथे २० बेडची सुविधा करण्यात आली असून, तेथे ३ ऑक्सिजन बेड ६ ICU बेड आणि एक व्हेंटिलेटर बेड असे १० बेड उपलब्ध आहेत. सर्वच बेडवर रुग्णांचा इलाज चालू आहे. ह्यांना मात्र ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा उपलब्ध होत आहे.

सायली हॉस्पिटलचे डॉक्टर विराज भोसले म्हणाले की, त्यांच्याकडे १५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये १० ऑक्सिजन बेड आहेत, तिथेही ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे त्यासाठी प्रशासनाने त्यामध्ये लक्ष घालून ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करण्याचे आवाहन केले आहे.

यशोराही हॉस्पिटलचे डॉक्टर दत्ता आंधळे ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार: त्यांच्याकडे २४ बेडची व्यवस्था असून १२ बेडला ऑक्सिजन उपलब्ध आहे आणि तिथे ही सर्वच बेडवर रुग्णांचा इलाज चालू आहे.

ृृृृृृृृृृृृृ----------------------

रुग्णवाहिकेत रुग्णासोबत नातेवाईक

एकंदर चित्र खूपच भयानक असून लोकांनी सामाजिक अंतर पाळून सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करावा. आपली काळजी घेऊन कोरोना होण्यापासून कसे वाचता येईल, ह्याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टर दत्ता आंधळे म्हणाले की, पूर्वी कोरोना पेशंट हा रुग्णवाहिकेमध्ये एकटा आणला जात होताच पण आता त्यांचे नातेवाईक त्यांच्या बरोबर येतात. तसेच जागोजागी गर्दी करून थांबत आहेत आणि अशा निष्काळजीपणामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे आहे. ह्या गोष्टींना कुठेतरी आळा बसण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Sewing- Lack of oxygen in the hospital in Uttamnagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.