पुण्यात शरद पवारांच्या हस्ते बिशप डॉ. थॉमस डाबरे यांचा सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:33 PM2021-10-17T17:33:09+5:302021-10-17T17:33:20+5:30
वानवडीतील सेंट पॅट्रिक चर्च मध्ये पुणे धर्मप्रांत बिशप डॉ थॉमस डाबरे यांचा धर्मगुरुपद दीक्षा सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वानवडी : वानवडीतील सेंट पॅट्रिक चर्च मध्ये पुणे धर्मप्रांत बिशप डॉ. थॉमस डाबरे यांचा धर्मगुरुपद दीक्षा सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
''लातुर येथे झालेल्या भुकंपामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावेळी जाती, धर्माचा विचार न करता सेवा कार्य करण्यात आले. डॉ. थॉमस डाबरे यांनी ५० वर्षे सेवा करताना इतर धर्मासाठी शांततेचा आणि ऐक्याचा संदेशासाठी पुढाकार घेतला. यांनी संत तुकारामांवर पीएचडी केली याचे कौतुक वाटतंय. विचारांचा सन्मान केला त्याचा आनंद आहे. त्यांचे समाजाप्रती असलेले कार्य मोलाचे असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.''
महाराष्ट्र मध्ये अस्मिता टिकून राहण्यासाठी तुकाराम संत महाराजांशिवाय पर्याय नाही
''लोकांच्या सहकार्याशिवाय कार्य करता येत नाही. सेवा आणि प्रेम अंतीम आहे. म्हणून सर्व धर्मात मिळून मिसळून शांती सलोख्याचे कार्य करत आहे. मदत करणे महत्वाचे कार्य मानत आलेलो आहे. महाराष्ट्र मध्ये अस्मिता टिकून राहण्यासाठी तुकाराम महाराजाशिवाय पर्याय नसल्याचे बिशप डॉ. थाँमस डाबरे यांनी यावेळी सांगितले.''
बिशप डॉ. थॉमस डाबरे मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे यांच्यासह हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वानवडी परिसरातील नगसेवक, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.