शरद पवार हे सर्वांचे गॅाडफादर आहेत. महाविकास आघाडीत सगळे त्यांचे ऐकतात. त्यामुळे कोणत्याही निर्णयाचा दोष त्यांच्यावर जाणारच असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबत सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पवार आरक्षण प्रश्नाला जबाबदार असल्याचे म्हणले होते. त्या पारश्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. इतकंच नाही कर आरक्षण प्रश्नी आपण थेट डिबेटला तयार असल्याचेही त्यांनी म्हणले आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाटील बोलत होते. “ जून ला कोणाच्याही ध्यानीमनी नसताना मुंडेंचे निधन झाले. आज ७ वर्ष झाली. दुपारी डाक विभाग त्यांच्यावर एक एन्व्हलप करत आहे. सतत संघर्ष हे त्यांचे ध्येय होते. कार्यालयातली पार्टी त्यांनी रस्त्यावर आणली. “
सध्याच्या भेटीगाठी हा संघर्ष संपवण्यासाठी आहेत का असं विचारल्यावर पाटील म्हणाले “ भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही. भेटीगाठी अनेक कारणांनी सुरु आहेत. पवार आजारी आहेत ही त्यांची चौकशी करायला. रक्षा खडसेंची भेट देखील घेतली. दुश्मन जरी असला तरी भेट घेणं ही संस्कृती”
पुण्यात झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या वादाबाबत बोलताना पाटील म्हणाले “ संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. वाद होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. जर संवाद नसेल तर अडचण असते. पण इथे ते आहे त्यांमुळे काळजी करण्याचे कारण नाही. “
आरक्षण प्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले “ पडळकरांनी काही भुमिका मांडली आहे. पवार सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसं म्हणल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. याविषयी खुली डिबेट करायची माझी तयारी आहे. मी निकाल वाचला. त्यात पावला पावलावर जाणवतंय की चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नाही.”