'नदीसुधार प्रकल्पाच्या भविष्याचा विचार करावा नाहीतर...'; शरद पवारांची PM मोदींना 'ही' विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 02:15 PM2022-03-05T14:15:11+5:302022-03-05T14:15:21+5:30

'नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय आकसापोटी....'

sharad pawar requesting prime minister narendra modi nadisudhar project metro | 'नदीसुधार प्रकल्पाच्या भविष्याचा विचार करावा नाहीतर...'; शरद पवारांची PM मोदींना 'ही' विनंती

'नदीसुधार प्रकल्पाच्या भविष्याचा विचार करावा नाहीतर...'; शरद पवारांची PM मोदींना 'ही' विनंती

Next

पुणेः खडकवासला, वरसगाव, पानशेत अशी मोठमोठी धरणे पुण्याच्या वरच्या भागात असताना नदीचे पात्र कमी करणे हे भविष्यातील मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते. पानशेत धरण फुटल्यानंतर पुण्याचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून गेला होता. अनेक संसार उद्धवस्त झाले, अनेक पुणेकर देशोधडीला लागले. असे असताना अतिवृष्टी किंवा ढगफुटीसारख्या घटना पुण्यात घडल्यास मोठे नुकसान होऊ शकते. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi tour) यांच्या हस्ते नदीसुधार प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पाच्या भविष्याचा विचार करावा, अशी माझी देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार खासदार शरद पवार (sharad pawar) म्हणाले.

नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय आकसापोटी झालेली आहे. गेल्या 20 वर्षांपासून नवाब मलिक प्रतिनिधीत्व करीत असताना हे प्रकरण आणि ही कारवाई पुढे येण्यामागे केवळ राजकीय आकस आहे. पंतप्रधानांनी विकासकामांची उद्घाटने करावी, परंतू आधी युक्रेनमध्ये अडकलेले निष्पाप विद्यार्थी भारतात सुखरूप येतील, यादृष्टीने कार्यवाही करावी. 

पुणे महानगरपालिकेतर्फे वारजे माळवाडी येथे उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या आधुनिक आणि सुसज्ज अशा कै. सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टीस्पेशालिटी व मॅटर्निटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा खासदार आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी ते बोलत होते.

Web Title: sharad pawar requesting prime minister narendra modi nadisudhar project metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.