नेणाऱ्या चोरट्याला मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पकडले असून, त्यांच्याकडून ५ लाख १३ हजार रुपयांचे दागिने व रोख दीड लाख रुपये असा ऐवज जप्त केला आहे.
अजय महावीर भुक्तर (वय १९, रा. सिद्धार्थनगर, हिंगोली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
मंडईमधील अखिल मंडई मंडळाच्या गणेश मंदिरातील सभा मंडपाकडे जाणाऱ्या मागील बाजूच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कटावणीच्या साहाय्याने उचकटून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला होता. त्यानंतर चोरट्यांनी श्री शारदा-गजाननाच्या मूर्तीवरील सुवर्णहार, कंठी, मंगळसूत्र अशे २५ तोळ्यांचे
सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक लहामगे व त्यांचे सहकारी हे हद्दीत गस्त घालत असताना धनजी स्ट्रीट नाका येथे शनिवारी सायंकाळी एक जण संशयास्पदरित्या थांबलेला आढळून आला. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ५ लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड आढळून आली. अधिक चौकशी केल्यावर त्याने आपण पुण्यातील गणेश मंदिरात चोरी केल्याची कबुल दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी याची माहिती पुणे पोलिसांना देऊन आरोपीला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात
दिले.
पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितले की, हा चोरटा सीसीटीव्हीमध्ये आढळला होता. त्यानंतर त्याचा माग काढला. तेव्हा तो रेल्वेने मुंबईला गेल्याचे दिसून आले. तो कुर्ला येथील ज्या लॉजमध्ये थांबला होता. तेथे गुन्हे शाखेचे पथक पोहोचले. लॉजच्या रजिस्टरमध्ये त्याने आपले नाव अजय भुक्तर असे नाव लिहिले होते. मात्र, तो रुममध्ये आढळला नाही. आरोपीची बॅग व बॅगमध्ये गुन्हा करताना त्याच्या अंगावर असलेले कपडे आढळून आले. त्याने या हॉटेलमध्ये सोने कोठे विकता येईल, याची चौकशी केली होती. तेव्हा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्याला दागिना बाजार हे ठिकाण सांगितले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी या बाजारपेठेतील सर्व सराफ व्यवसायिकांना नोटीस बजावून त्यांना असा कोणी दागिने विकण्यास आल्यास कळविण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. तसेच त्यांना आरोपीचा फोटो व व्हिडिओ मुंबई सराफ असोसिएशनच्या संबंधित व्हॉटसॲप ग्रुपवर प्रसारित करण्यास सांगितले.
मुंबईत आरोपीचा घेतला शोध
दागिने विकण्यासाठी आलेला आरोपी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांच्या निदर्शनास आला व त्यांनी त्याला ताब्यात घेतले. मुंबईतच आरोपीचा शोध घेत असलेल्या विश्रामबाग पोलिसांच्या पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी एलटीटी मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक कुंडलीक कायगुडे तपास करीत आहेत.