पुणे : घरच्यांनी मनाच्या विरोधात तिचे लग्न लावून दिले. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांनतर तिने फेसबुकवरील एका मित्राशी लव्ह मॅरेज केले. पण आधीच्या पतीबरोबर घटस्फोट न घेता केलेले दुसरे लग्न न्यायालयाने रद्द ठरविले.कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. नाईकवडे यांनी हा निकाल दिला. विशेष म्हणजे पहिले लग्न लपवून तिच्या आई वडिलांनीच मोठ्या धुमधडाक्यात तिचे दुसरे लग्न लावून दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा आणि सुभाष (नावे बदललेली) यांचे डिसेंबर २०१७ साली लग्न झाले होते. परंतु, रेखा हिने तिचे आधी झालेले लग्न सुभाषपासून लपवले होते. रेखा हिचे तिच्या कुटुंबियांनी अरेंज मॅरेज केले होते. लग्नाच्या काही महिन्यांतर तिची सुभाष यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी २०१७ साली लग्न केले. मात्र या सर्वांची रेखाच्या पहिल्या पतीला कल्पनाही नव्हती. त्याला ही सर्व माहिती मिळाल्यानंतर त्याने थेट सुभाषला गाठले आणि सर्व प्रकार सांगितला. आईला भेटायच्या नावाखाली ती दोन ते तीन आठवडे पुण्यात सुभाष यांच्याकडे राहिली. याबाबत सुभाष यांनी रेखाच्या कुटुंबियांना जाब विचारला असता त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत त्याने पोलिसांत तक्रार देखील दिली आहे. तसेच तिला नांदवावे यासाठी सुभाष यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत सुभाष यांनी अॅड. पुष्कर पाटील यांच्यामार्फेत कौटुंबिक न्यायालयात लग्न रद्द करण्यासाठी दावा दाखल केला होता. पहिल्या लग्नाची माहिती लपवून रेखा हिने सुभाष यांच्याशी केलेले लग्न बेकायदेशीर ठरवत रद्द करण्याचा निर्णय दिला. सोशलमाध्यमांद्वारे त्यांचे लग्न झाले. त्यात तक्रारदार यांची फसवणूक झाली आहे. मात्र त्यांच्यावर एक लग्न झाल्याची शिक्का लागला आहे. ही मानसिकता बदलने गरजेचे आहे, असे अॅड. पाटील यांनी सांगितले.
तिने पहिलं लग्न लपवून दुसरे ‘लव्ह मॅरेज’ केले ; न्यायालयाने ते रद्द केले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 12:38 PM
विशेष म्हणजे पहिले लग्न लपवून तिच्या आई वडिलांनीच मोठ्या धुमधडाक्यात तिचे दुसरे लग्न लावून दिले होते.
ठळक मुद्देफेसबूकवरून झाली होती मैत्री