राज्यात भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून सहभागी असलेल्या तीनही पक्षांची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आम्हाला अपेक्षित असलेल्या जागांची यादी भाजपकडे दिली आहे. भाजपने सोबत न ठेवल्यास एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाऊ. अन्य कोणत्याही पक्षाशी महायुती केली जाऊ शकते. रिपब्लिकन पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता भाजपसोबत स्थानिक निवडणुकांसाठी युती केली, असे सांगण्यात आले. पुण्यात स्वाभिमानी पक्षाने ७/८, शिवसंग्रामने १८ तर रासपने २५ जागांची मागणी केली असून, त्यांपैकी काही जागांबाबत आग्रही असून, बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांमध्ये या पक्षांचे उपद्रवमूल्य आहे. २९ तारखेला महादेव जानकर, विनायक मेटे व राजू शेट्टी हे पक्षनेते कोणत्या पक्षासोबत यावे, तिन्ही घटकपक्षांनी किती जागा लढवाव्यात, हे एका बैठकीत ठरवतील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)