Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 : शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे 4285 मतांनी तिसऱ्या आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 09:49 AM2024-11-23T09:49:45+5:302024-11-23T09:54:45+5:30
Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 : शिवाजीनगर मतदारसंघात एकूण २० फेऱ्या होणार आहेत, आणि दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल हाती येतील.
Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 : जिल्ह्यातील २१ विधानसभा निवडणुकीसाठी आज होणाऱ्या मतमोजणीच्या ४६५ फेऱ्या होणार आहेत, आणि दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल हाती येतील. पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा पुणे लोकसभा मतदारसंघातील एक प्रमुख मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.
या मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यामध्ये थेट लढत झाली. गतवर्षी अटीतटीच्या लढतीत ५,१२४ मतांनी दत्ता बहिरट यांचा पराभव झाला होता.
शिवाजीनगर मतदारसंघात एकूण २० फेऱ्या होणार आहेत, आणि दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल हाती येतील. त्यातील तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीचा निकाल जाहीर झाला असून या फेरीत सिद्धार्थ शिरोळे 4285 मतांनी मतांनी आघाडीवर आहे. शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे 4285 मतांनी तिसऱ्या आघाडीवर आहे.
तिसरी फेरी
आघाडीवर : सिद्धार्थ शिरोळे ( भाजप ) - 4285 मते
पिछाडीवर: दत्ता बहिरट