पुणे-सोलापूर महामार्गावर शिवशाही बसने चिमुरडीला चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 05:04 PM2020-01-21T17:04:29+5:302020-01-21T17:12:27+5:30
लोणी देवकर उड्डाणपुलाजवळ शिवशाही बसने ३ वर्षीय चिमुरडीला चिरडल्याची धक्कादायक घटना
बिजवडी : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी देवकर उड्डाणपुलाजवळ शिवशाही बसने ३ वर्षीय चिमुरडीला चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २१)सकाळी घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता रोखुन धरला.त्यामुळे वाहतुक ठप्प झाली होती. स्थानिकांची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. रिया प्रेम कुमार गौतम असे या चिमुरडीचे नाव आहे.एमआयडीसीमध्ये मजुरी करणाऱ्या परराज्यातून आलेल्या कुटुंबीयांची रिया ही एकुलती एक मुलगी होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रियाउड्डाणपुलावरील रस्ता ओलांडत होती.यावेळी वेगाने आलेल्या शिवशाही बसनेतिला जोराची धडक देऊन चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतरस्थानिक ग्रामस्थांनी बस रोखून धरत महामार्गावरील वाहतूक अडवून धरली.आॅलकंपनीचे गस्ती वाहक फोन करूनही तात्काळ उपलब्ध झाले नाही,त्यामुळेस्थानिक ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या .
इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी स्थानिकांचीसमजूत काढून महामार्ग सुरक्षित केला. यावेळी पेपर रिपब्लिकन पाटीर्चेपुणे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत गायकवाड, बाळासाहेब धोंडे म्हणाले की, लोणीदेवकर ते सर्व प्रकारच्या एसटी बसथांबा मंजूर आहे. टोल कंपनीने दोन्हीबाजूला बस थांबाची सोय केली आहे. मात्र एकही एसटी बस बसथांब्यावर थांबतनाही .गावातून उड्डाणपुलावरून सर्व सुसाट वेगाने जातात. परिणामी लोकांनाउड्डाणपुलावरून सोडून जावे लागते. यामुळे येथे अनेक अपघात घडल्याचीमाहिती स्थानिकांनी दिली.