पुणे - सातारा महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट; जिवीतहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 06:29 PM2022-03-14T18:29:42+5:302022-03-14T18:30:13+5:30
चालकाच्या समय सुचकतेने आणि वाहतूक व राजगड पोलिसांच्या तात्काळ मदतीने जिवीतहानी टळली
नसरापूर : पुणे- सातारा महामार्गावर दुपारी चारच्या दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या शिवाशाही बसने अचानक पेट घेतला. मात्र या दुर्घटनेत चालकाच्या समय सुचकतेने आणि वाहतूक व राजगड पोलिसांच्या तात्काळ मदतीने कोणालाही इजा पोहोचली नाही. वाहतूक तास ते दीड तास थांबवून सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली.
दुपारी ४ वाजल्याच्या दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरळीत सुरू होती. या दुर्घटनेमुळे पोलिसांना महामार्गावरील बघ्यांची गर्दी हटविणे मोठ्ये त्रास दायक बनले होते. सातारा पुणे महामार्गाचे पो. नि. असलम खातीब यांनी दिलेल्या माहिती नुसार, सांगली ते पुणे जाणारी शिवशाहीने अचानक पेट घेतला. त्यावेळी ही बस चालकाने प्रसंगावधान ओळखून पोलिसांच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला घेतली. यावेळी मात्र महामार्गावर या प्रकाराने पोलिसांकडून पुढील धोका होऊ नये याकरीता महामार्गाच्या दोन्ही बाजू वाहतुकीस थांबविण्यात आली होती. थोड्याच वेळात अग्नीशमन दलाचे दोन वाहने घटनास्थळी आल्यानंतर आग आटोक्यात आली. यावेळी महामार्ग पोलिसांचे सात जवान आणि राजगड पोलीस यांनी नागरिकांच्या मदतीने तात्काळ मदत पोहचवून पुढील अनर्थ टळला.