शिवशाहीचा अजब-गजब कारभार, बुकींग स्वारगेटचं अन् गाडी सुटली हडपसरहून...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 10:35 AM2018-12-24T10:35:10+5:302018-12-24T10:36:10+5:30

महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या बस खासगी कंत्राटदाराच्या असून विनावाहक चालविण्यात येतात.

Shivshahi's management fail, booking from Swargate's but bus available in hadapsar | शिवशाहीचा अजब-गजब कारभार, बुकींग स्वारगेटचं अन् गाडी सुटली हडपसरहून...

शिवशाहीचा अजब-गजब कारभार, बुकींग स्वारगेटचं अन् गाडी सुटली हडपसरहून...

Next

पुणे - महाराष्ट्र परिवहन मंडळातर्फे सुरू करण्यात आलेली शिवशाही बस नेहमीच चर्चेचा मुद्दा बनली आहे. कधी प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे तर कधी गाडीला होणाऱ्या अपघातांमुळे ही बससेवा वादात सापडत आहे. विशेष म्हणजे या बससेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असूनही अनियोजित सेवेमुळे ही बससेवा त्रासदायक ठरत आहे. रविवारीही असाच प्रत्यय सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीतील एका प्रवाशाला आला. प्रवासी अॅड. महेश बाफना यांचे बोर्डींग पाईंट स्वागरेट असतानाही त्यांना हडपसर येथे येण्याचे सांगण्यात आले.  

महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या वातानुकूलित बस खासगी कंत्राटदाराच्या असून विनावाहक चालविण्यात येतात. केवळ खासगी ड्रायव्हरच्या भरोशावर ही बससेवा चालविण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मंगळवारी पुणे ते बार्शी प्रवास करणाऱ्या अॅड. लखन बाफना यांनाही शिवशाहीच्या या खराबसेवेचा फटका सहन करावा लागला आहे. लखन बाफना यांनी पुणे येथून बार्शीसाठी आपले सीट आरक्षण बुकींग केले होते. ऑनलाईन अॅपच्या सहाय्याने हे आरक्षण बुक करण्यात आले होते. त्यानुसार, बोर्डींग पाईंट स्वागरेट असा ठेवण्यात आला होता. मात्र, बाफना यांना ऐनवेळी शिवशाहीच्या संबंधित यंत्रणेकडून बोर्डींग स्वागरेट येथून होणार नसून तुम्ही हडपसरला या, असे कळविण्यात आले. त्यामुळे बाफना यांनी नाराजी व्यक्त करत, माझे बुकींग रद्द करा, असे संबंधितांना म्हटले. मात्र, आता बुकींग रद्द होणार नाही, असे सांगण्यात आल्याने बाफना यांना ऐनवेळी मिळेल ते वाहन पकडून स्वारगेटहून हडपसरला जावे लागले. त्यामुळे त्यांना मानिसक त्रास सहन करावा लागला असून या घटनेमुळे शिवशाहीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. बाफना  यांनी आपल्या फेसबुकवरुन याबाबत नाराजी व्यक्त  करत बसच्या बुकींगचा फोटोही शेअर केला आहे. त्यावर, अनेकांनी कमेंट करुन आपणासही असाच अनुभव आल्याचं सांगितलं. रविवारी रात्री 9 वाजता ही बस  स्वारगेट येथून बार्शीसाठी जाणार होती. मात्र, ऐनवेळी हडपसर येथून बोर्डींग होणार असल्याचं सांगण्यात आलं. 

दरम्यान, शिवशाही ही बससेवा प्रवाशांसाठी उत्कृष्ट आहे, पण खासगीकरणामुळे याचे नियोजन ढेपाळल्याचे दिसून येते. त्यामुळेच, आता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शिवशाहीच्या सुनियोजनाकडे गांभिर्याची बाब म्हणून पाहणे गरजेचं आहे.

Web Title: Shivshahi's management fail, booking from Swargate's but bus available in hadapsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.