पुणे : लॉकडाऊनच्या काळात शहरातील सर्वच व्यवहार बंद असल्याने गुन्हेगारीवरही आळा बसला होता. अनलॉक झाल्यानंतर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, असे असले तरी अन्य कोणत्याही गुन्ह्यांपेक्षा शहरात खुनाचे सत्र वाढले असून गतवर्षीपेक्षा यंदा अधिक झाले आहेत. त्यातही 'क्रूरता' वाढल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊनमध्ये संपूर्ण शहर जवळपास २ महिने बंद होते. २४ तास पोलीस रस्त्यावर असल्याने गुन्ह्यांमध्ये गर्दी, मारामारी, खुन, घरफोडी, चोरी अशा गुन्ह्यांमध्ये घट झाली होती. मात्र, अनलॉकमध्ये आता वाहनचोरी, चोरी, दुखापत, घरफोडीच्या गुन्ह्यात वेगाने वाढ होत आहे़. सप्टेबरअखेर शहरात ५५ खुनांची नोंद झाली होती. गेल्या २१ दिवसात तब्बल ९ खुन झाले असून त्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून त्यातील क्रुरता पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर छोट्या मोठ्या कारणावरुन दुखापत करुन लोकांना जखमी करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.तसेच रात्री अपरात्री रस्त्यावरुन जाणाऱ्यांना लुबाडण्याचे प्रमाण वाढले आहे.
लॉकडाऊन व अनलॉकमध्ये परवानगीशिवाय घराबाहेर पडणारे, विनामास्क फिरणाऱ्यांवर कलम १८८ नुसार मोठ्या प्रमाणावर कारवाई केली गेली. त्यामुळे भाग ६ च्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे.़़़़़़़़़़़शहरातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून गुन्हे करणाऱ्यांवर गंभीर कलमांन्वये कारवाई करण्यात येत आहे़. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. गेल्या काही दिवसात घडलेल्या सर्व ९ खुनांच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात यश आले असून त्यातील एका प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे़ ़़़़़़़
गुन्हा २१ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑक्टोबर २०१९ अखेरखुन ६४ ६३खुनाचा प्रयत्न ७० १०२दरोडा ३ १७दरोडा तयारी १५ १५चैन स्रचिंग ३६ ५५मोबाईल स्रचिंग ३८ ६१इतर जबरी चोरी ३६ ५५घरफोडी २५५ ३९५गर्दी मारामारी १२० १३४दुखापत ७६२ ७४५विवाहितेला क्रुर १९३ २२५वागणूक देणेबलात्कार १२३ १८९विनयभंग २१० ३४७फसवणूक ३८० ८१७चोरी ४४३ १.१६४वाहनचोरी ६६४ १.४४६एकूण भाग ५ गुन्हे ४.३२० ७.३५८भाग ६ चे गुन्हे २८.८३० ४.७८३एकूण गुन्हे ३३,१५० १२,१४१