धक्कादायक! चॉकलेटची बरणी चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 07:55 PM2018-03-06T19:55:36+5:302018-03-06T19:55:36+5:30
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील दोंदे गावात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. किराणा दुकानातील चॉकलेटची बरणी चोरी करतानाचा व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याने ४३ वर्षांच्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विठ्ठल विष्णू बारणे (वय ४३) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दोन दिवसांपूर्वी वडगाव (ता.खेड) येथील नवनाथ किरणा प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानात विठ्ठल बारणे याने जाऊन गाय छाप व चॉकलेट विकत घेतली. दरम्यान विठ्ठल यांनी दुकानातील चॉकलेट बरणी दुकानदारांची नजर चुकवून चोरून नेली. हा प्रकार सी.सी.टीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून दुसºया दिवशी विठ्ठल बारणे यांचे भाऊ संतोष बारणे यांनी संबंधित दुकानात जाऊन दुकान मालक विनायक पाटोळे यांच्याशी चर्चा करून चोरी केलेल्या चॉकलेट बरणीचे पैसे देऊन प्रकरण मिटवून टाकले होते. मात्र, दि. ५ फेब्रुवारी रोजी दोंदे गावचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत संभाजी बारणे यांनी सी.सी टीव्हीमध्ये कैद झालेल्या चित्रणाचे मोबाईलवर रेकॉर्ड झालेले चित्र गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले.
या व्हिडीओत विठ्ठल बारणे यांचा चेहरा व चॉकलेटची बरणी चोरून नेत असल्याचे दिसत होते. विठ्ठल बारणे यांची गावात बदनामी झाली. नैराशग्रस्त होऊन विठ्ठल बारणे यांनी रात्रीच्या वेळी गावातील दशक्रिया घाटातील बांधलेल्या शेडच्या लोखंडी अॅगलला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्याचा भाऊ संतोष बारणे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे..