धक्कादायक! पुण्यातल्या नामांकित रुग्णालयातील डॉक्‍टर महिलेच्या बेडरुम व बाथरुममध्ये छुपा स्पाय कॅमेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 06:18 PM2021-07-08T18:18:41+5:302021-07-08T18:18:55+5:30

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल, सदर ठिकाणी लावण्यात आलेले छुपे स्पाय कँमेरे पोलिसांनी जप्त केले

Shocking! Spy camera in the bedroom and bathroom of a woman doctor at a reputed hospital in Pune | धक्कादायक! पुण्यातल्या नामांकित रुग्णालयातील डॉक्‍टर महिलेच्या बेडरुम व बाथरुममध्ये छुपा स्पाय कॅमेरा

धक्कादायक! पुण्यातल्या नामांकित रुग्णालयातील डॉक्‍टर महिलेच्या बेडरुम व बाथरुममध्ये छुपा स्पाय कॅमेरा

googlenewsNext
ठळक मुद्देबेडरूम आणि बाथरूममधील लाईट लागत नसल्याने इलेक्ट्रीशनला बोलवल्यावर कॅमेरा असल्याचा खुलासा झाला.

धनकवडी: शहरातील एका नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्‍टरच्या सर्व्हिस क्वार्टरमध्ये स्पाय कॅमेरा लावल्याची घटना उघडकीस आली आहे. हा कॅमेरा बाथरुम आणि बेडरुममध्ये लावण्यात आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर ठिकाणी लावण्यात आलेले छुपे स्पाय कँमेरे पोलिसांनी जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ३१ वर्षीय महिला डॉक्‍टर एका नामांकित महाविदयालयाशी संलग्न रुग्णालयात काम करते. ती रुग्णालयाच्या सर्व्हिस क्वार्टरमध्ये आणखी एका महिला डॉक्‍टरसह राहते. ती मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातील काम उरकल्यावर फ्रेश होण्यासाठी रुमवर आली होती. यावेळी तीने बाथरुमची लाईट लावली असता ती सुरु झाली नाही. यानंतर बेडरुमची लाईटही सुरु झाली नाही.

यामुळे तीने इलेक्‍ट्रीशनला बोलवले. त्याने दुरुस्ती करण्यासाठी बाथरुममधील बल्पचे होल्डर खोकल्यावर, आत स्पाय कॅमेरे, त्याचे मेमरी कार्ड आणि बॅकअप आढळला. यानंतर बेडरुमच्या बल्पचे होल्डर खोलले असता तेथेही असाच प्रकार आढळून आला. यानंतर तीने तातडीने धाव घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करता सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे समजले तसेच रखवालदारानेही येथे दुसरे कोणी आले नसल्याचे सांगितले. पोलिस या प्रकरणी कसून तपास करत आहेत. 

Web Title: Shocking! Spy camera in the bedroom and bathroom of a woman doctor at a reputed hospital in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.