ऑनलाइन लोकमतशिक्रापूर दि. २३ - साधू असल्याचे भासवून चमत्कार दाखवून तिघांनी एका व्यक्तीला लाखोंचा गंडा घातल्याची घटना शिक्रापूरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.अमोल शशिकांत वाबळे यांना गेल्या महिन्यात फॅब्रकेशनचे काम चालू असताना दोन साधूंनी तुमच्याकडे खूप धन असल्याचे सांगून धंद्यात काही अडचणी असून सदगुरू महाराज दूर करतील, असे सांगत पाच रुपयांची जुनी नोट काढीत दैवी नोट असल्याचे सांगत नोटेचा विधी केल्यावर तुझ्या मनात ते काही आहे ते प्राप्त होईल इंदिरा गांधीचे चित्र असलेले त्या एक रुपया काढून त्याचा विधी केल्यावर चार पिढ्या बसून खातील एवढे पैसे मिळतील असे सांगत निघून गेला. त्यानंतर २४ डिसेंबर रोजी आळंदी घाटावर बसलेल्या साधूने फोन करून विधीसाठी नऊ हजार रुपये रोख आणण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना २९ डिसेंबर रोजी महाराजांना अकांऊट नंबर देत ५० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार ते पाठविण्यात आले. पाच जानेवारी रोजी पुन्हा एक लाख दहा हजार रुपये दुसऱ्या पूजेसाठी आरटीजीएस केले, त्यानंतर ९ जानेवारी रोजी पन्नास हजार , १३ जानेवारी एक लाख दहा हजार १६ जानेवारी एक लाख रुपये असे एकूण ४ लाख २९ हजार रुपये महाराजांच्या अकाऊंडवर पैसे आले. त्यानंतर पैशाचा होम करून जादुटोणा व पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सागरनाथ मिठानाथ परमार, चंदुनाथ सागरनाथ परमार रा. वडगाव तालुका जिल्हा पालमपुर, गुजरात, पटेलनाथ समजुनाथ चव्हाण, रा. सतलासा, ता.सतलासा जि. म्हैसाना,गुजरात सर्व सध्या रा. सासवड ता. पुरंधर यांनी फसवणूक केली आहे. या सर्वाना शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गणेश वारुळे व यांच्या पथकाने ताब्यात घेतलेली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे करीत आहेत.
साधू असल्याचे सांगून गंडवले
By admin | Published: January 23, 2017 5:57 PM