त्यांनाही वारी पाहता यावी यासाठी फेसबुक दिंडीची नेत्रवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 07:53 PM2018-07-05T19:53:41+5:302018-07-05T19:59:40+5:30
फेसबुक दिंडीच्या माध्यमातून यंदा नेत्रवारी हा उपक्रम राबविण्यात येणार असून या माध्यमातून लाेकांना नेत्रदान करण्याचे अावाहन करण्यात येणार अाहे.
पुणे : " पंढरीच्या वारीचा हा अनुपम्य सुखसोहळा
पाहीन मी याची देही याची डोळा "
पंढरीची वारी ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी अानंददायी असा साेहळा असताे. लाखाे वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात विठुनामाचा जप करत अाळंदी व देहूकडून पंढरीकडे जात असतात. ज्यांना हा दैदिप्यमान साेहळा पाहता येत नाही त्यांच्यासाठी पुण्यातील तरुण मंडळी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून ही वारी त्यांच्यापर्यंत पाेहचवत असतात. परंतु यंदा याही पुढे जात नेत्रहीन बांधवांना सुद्धा ही वारी याची देही याची डाेळा पाहता यावी यासाठी फेसबुक दिंडीच्या वतीने नेत्रवारी ही संकल्पलना यंदाच्या वारीत राबविण्यात येत अाहे. या माध्यमातून नागरिकांना नेत्रदान करण्याचे अावाहन करण्यात येत असून त्यासाठी एका अॅपची निर्मिती करण्यात अाली अाहे.
गेल्या अाठ वर्षांपासून फेसबुक दिंडीच्या माध्यमातून पुण्यातील तरुण वारी साेहळा जगभरातील लाेकांपर्यंत पाेहचवत अाहेत. स्वप्निल माेरे याने या फेसबुक दिंडीची स्थापना केली. त्यानंतर दरवर्षी वारीचे फाेटाे, अपडेटस तसेच वारीचे अाकर्षक व्हिडीअाे या फेसबुक दिंडीच्या टीमच्या माध्यमातून देशादेशीच्या मराठी बांधवांपर्यंत त्यांनी पाेहचवले. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी वारीच्या वार्तांकनाबराेबरच एक सामाजिक संदेश देण्याचे काम सुरु केले अाहे. यंदा नेत्रवारी ही संकल्पना घेऊन लाेकांना नेत्रदान करण्याचे अावाहन त्यांच्याकडून करण्यात येत अाहे. व्यंकटेश परिवार, औरंगाबाद या अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत अाहे. 2016 साली “पाणी वाचवा” हा संदेश देण्यात अाला हाेता तर गतवर्षी वारी ती ची हा उपक्रम हाती घेण्यात अाला हाेता. या दाेन्ही उपक्रमांना नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. फेसबुक दिंडीच्या माध्यमातून यंदा वारीचे एक थिम साॅंग सुद्धा तयार करण्यात अाले असून हे गाणं अाता महाराष्ट्रातील जनतेच्या हृद्ययाचा अाता ठाव घेत अाहे.
याबाबत बाेलताना स्वप्निल माेरे म्हणाला, गेल्या अाठ वर्षांपासून फेसबुक दिंडीच्या माध्यमातून वारी घरघरांमध्ये पाेहचविण्याचं काम अाम्ही करीत अाहाेत. फेसबुक दिंडीच्या माध्यमातून वारी नागरिकांना अनुभवता येत हाेती. परंतु ज्यांना डाेळे नाहीत त्यांनाही या वारीचा अनुभव घेता यावा यासाठी यंदा अाम्ही नेत्रवारी करण्याचा निर्णय घेतला. 20 लाखांहून अधिक नेत्रहिनांच्या अायुष्यात अंधकार अाहे. तर त्या प्रमाणात नेत्रदान करणारे लाेक हे 2 चे 3 टक्के अाहेत. त्यामुळे समाजात एक जागरुकता निर्माण करण्यासाठी यंदा नेत्रवारी उपक्रम राबविण्यात येत अाहे. त्यासाठी फेसबुक दिंडीचे अॅप तयार करण्यात अाले असून नेत्रवारीचा फार्मही त्यात देण्यात अाला अाहे. नागरिक अाॅनलाईन फार्म भरु शकणार अाहेत. त्याचबराेबर यंदा फेसबुक दिंडीच्या माध्यमातून 360 काेणातील फाेटाे पाहण्याची संधी लाेकांना मिळणार अाहे.