श्रींचे अश्व अलंकापुरीत दाखल ; माउली मंदिरात अश्वांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 08:42 PM2018-07-05T20:42:37+5:302018-07-05T20:44:20+5:30
माउलीचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून निघाल्यानंतर ११ दिवसांचा प्रवास करून अलंकापुरीत हरिनाम गजरात दाखल झाले.
आळंदी : माउलीचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून निघाल्यानंतर ११ दिवसांचा प्रवास करून अलंकापुरीत हरिनाम गजरात दाखल झाले.पालखी सोहळ्यातील परंपरा प्रमाणे अश्वांचे आळंदी संस्थांचे वतीने स्वागत करण्यात आले.
श्रींचे अश्वाचें अंकली (ता.चिकोडी,बेळगावी,कर्नाटक) येथील राजवाड्यातून सोमवारी ( दि.२५ ) जूनला श्रींचे अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान झाले होते .११ दिवसांचे प्रवासा नंतर अश्वाचें प्रथम येथील श्रीगोपाळकृष्ण मंदिर बिडकर वाड्यात विसावले.येथे हरप्रीतसिंग बिडकर सरदार,उमेश बिडकर आणि बिडकर परिवार यांचे तर्फे पूजा स्वागत करण्यात आले. बिडकर वाड्यातील विश्रांती विसाव्या दरम्यान माउलीचे मंदिरात अश्व आळंदी समीप आल्याचा निरोप मिळताच श्री गुरुहैबतरावबाबा यांचे दिंडीने प्रथा परंपरेने अश्वांचे स्वागत पूजा केली.यावेळी अश्व सेवेचे मानकरी उर्जितसिंह शितोळे सरदार,बाबाराजे शितोळे सरकार,आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक,पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील,विश्वस्त अजित कुलकर्णी,श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे,रामभाऊ रंधवे,मानकरी बाळासाहेब कु-हाडे,शिवाजी भोसले,योगेश आरु,राजाभाऊ चौधरी,स्वामी सुभाष महाराज ,माजी व्यवस्थापक बंडोपंत कुलकर्णी,कर्णा सेवेचे मानकरी बल्लाळेश्वर वाघमारे,माउली निंबाळकर आदीसह भाविक,वारकरी उपस्थित होते.
सनईचे वादनात,हरीनाम गजर आणि भाविकांची अश्व दर्शनास गर्दी केली होती.अश्व माउली मंदिरात आले.पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रींचे अश्वांचे स्वागत केले.आळंदी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर कारंजा मंडपात सोहळ्यासह संस्थानचे वतीने अश्व पूजा झाली.मानकरी यांना नारळप्रसाद देण्यात आला.अश्व पूजे नंतर अश्व येथील फुलवाले समाज धर्मशाळेत मुक्कामी पोहचले.दरम्यान रात्री मंदिरात गुरुवारची श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा नंतर आरती झाली.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी अंकलीकर राजवाड्यात जावून अश्व प्रस्थान सोहळा अनुभवला .यावेळी श्रींचे पालखी सोहळ्यात महानैवेद्याचे मानकरी श्रीमंत उर्जीतसिंह शितोळे सरकार यांचे कडे श्रींचे सोहळ्यात महानैवेद्य ठेवण्यासाठी येथील श्रींचे सोहळ्यातील अब्दागिरी सेवेचे मानकरी योगेश आरू यांनी भेट दिलेला वैभवी चांदीचा चौरंग आणि पाट सरकार यांचे कडे सन्मान पूर्वक मालक बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आला.