सिया स्कूलचे काम कौतुकास्पद - पी. जी. भालेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:41+5:302021-07-15T04:08:41+5:30

पारगाव तालुका दौंड येथे डाॅ. पी. जी. भालेराव यांच्या 'माझा गाव' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी ...

Sia school work admirable - p. G. Bhalerao | सिया स्कूलचे काम कौतुकास्पद - पी. जी. भालेराव

सिया स्कूलचे काम कौतुकास्पद - पी. जी. भालेराव

Next

पारगाव तालुका दौंड येथे डाॅ. पी. जी. भालेराव यांच्या 'माझा गाव' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी सचिन पिंगळे सरांनी मनोगत व्यक्त करताना एक शिक्षक अनेक विद्यार्थी घडवत असतो. शिक्षक राष्ट्रबांधणीचे काम करतात. पी. जी. भालेराव सरांनी केलेले उत्कृष्ट मार्गदर्शन, त्यांनी केलेला आत्तापर्यंतचा प्रवास त्यांनी अगदी सहज शब्दांत व्यक्त केला. त्यांच्या पुस्तकातील काही कवितांचे वाचन त्यांनी या वेळी केले. त्यांच्या गावाचे वर्णन करताना त्यांना गावाविषयी असणारे प्रेम, आपुलकी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. या वेळी कार्यक्रमासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे (चाकण) संस्थापक प्रा. एन. डी. पिंगळे, विजय काळे, नामदेव काळे, पी. एस. ताकवणे, भालेराव सर, एस. एन. शेळके, त्रिभुज शेळके, सिया स्कूलचे संस्थापक एम. एन. कदम व सर्व स्टाफ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आरती पठारे यांनी केली व प्राजक्ता दिवेकर यांनी आभार मानले.

--

फोटो क्रमांक : १४ केडगाव सिया इंग्लिश मीडिअम स्कूल

पारगाव येथे पी. जी. भालेराव यांचा सत्कार करताना नामदेव काळे.

Web Title: Sia school work admirable - p. G. Bhalerao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.