समाजाच्या जडणघडणीमध्ये वारकरी सांप्रदायाचे महत्त्वपूर्ण योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:17 AM2021-02-06T04:17:14+5:302021-02-06T04:17:14+5:30
अखिल भारतीय वारकरी मंडळाचा दौंड तालुकास्तरीय मेळावा बोरमल नाथ देवस्थान चौफुला याठिकाणी पार पडला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हभप ...
अखिल भारतीय वारकरी मंडळाचा दौंड तालुकास्तरीय मेळावा बोरमल नाथ देवस्थान चौफुला याठिकाणी पार पडला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हभप दत्तात्रय सोळसकर महाराज, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नामदेव चव्हाण, महाराष्ट्र राज्य संत वाड्मय प्रचार प्रसार प्रमुख आनंद महाराज तांबे,विभागीय उपाध्यक्ष दिपक म. खांदवे पुणे जिल्हाध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर, राजेंद्र म. भाडळे, युवराज शिंदे, ज्येष्ठ कीर्तनकार बंकट महाराज ढवळे, दौंड तालुकाध्यक्ष शामसुंदर महाराज ढवळे, सुभाष गायकवाड, नाना महाराज दोरगे, सयाजी ताकवणे, लालासो शितोळे, कैलासआबा शेलार, महादेव शितोळे, राजेंद्र पिलाणे, रामदास नरुटे, शिवाजी गुंड, परसुराम शिंदे, प्रकाश तरटे आदी वारकरी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रम सूत्रसंचालन कार्याध्यक्ष हभप हरिष महाराज फडके यांनी केले तर आभार सचिव अभिजित महाराज जाचक यांनी मानले. यावेळी बोरमलनाथ देवस्थान प्रमुख व गोपालन समिती वारकरी मंडळ ता. प्रमुख कैलास शेलार यांनीही या कार्यक्रमाला महत्त्वपूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
०४ केडगाव बोधले
चौफुला येथे हभप प्रकाश महाराज बोधले यांचा सत्कार करताना मान्यवर.