पिंपरी: फेब्रुवारीपासून शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. महापालिकेने तयार केलेल्या मेजर आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन मध्ये सद्यस्थितीत ८७९ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. तर २१५ मेजर कंटेन्मेंट झोन आहेत. दोन्ही कंटेन्मेंट झोन मध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेची चिंता वाढणार असल्याचे दिसून येत आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोन तयार केले जात आहेत. महापालिकेने शहरात मायक्रो आणि मेजर कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले. शहरात सध्या ११ हजार ९२२ सक्रिय रुग्ण आहेत. दररोज १ हजार ५०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. परंतु सक्रिय रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या झोनची विभागणी केली आहे. त्यामुळे दोन्ही कंटेन्मेंट झोनची वाढही झपाटयाने होत आहे. कंटेन्मेंट झोनने आता एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दर दिवसाला दोन्ही कंटेन्मेंट झोनमध्ये चढ - उतार होताना दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. बऱ्यापैकी रुग्णांना घरी राहण्याचा सल्ला महापालिकेकडून दिला जात आहे. कंटेन्मेंट झोन मध्ये वाढ झाली आहे. पण त्यामुळे महापालिकेची चिंता वाढणार आहे. कारण गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांकडे लक्ष ठेवणे, हे पालिकेसमोरील आव्हान असणार आहे.
मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणजे काय ?
सोसायटीमधील एखाद्या घरात एक किंवा दोन रुग्ण आढळले. तर सोसायटी पूर्ण सील न करता रुग्ण राहणारा मजला सील केला जातो.
मेजर कंटेन्मेंट झोन म्हणजे काय ?
एखाद्या सोसायटीत आठ पेक्षा जास्त रुग्ण आढळले. तर ती सोसायटी सील करून त्याला मेजर कंटेन्मेंट झोन म्हणून सील केले जाते.
दहा मार्च नंतर वाढलेले कंटेन्मेंट झोन
१० मार्च: मेजर १६९, मायक्रो ६०२११ मार्च: मेजर १२०, मायक्रो ६६३१२ मार्च: मेजर १३२, मायक्रो ७०५१३ मार्च: मेजर १३८, मायक्रो ८३३१४ मार्च: मेजर १४४, मायक्रो ८३३१५ मार्च: मेजर १४६, मायक्रो ८९५१६ मार्च: मेजर १५८, मायक्रो ८९५१७ मार्च: मेजर १४५, मायक्रो ७५२१८ मार्च: मेजर १५९, मायक्रो ८३२ १९ मार्च: मेजर १७९, मायक्रो ८३२ २० मार्च: मेजर १८२, मायक्रो ८४५२१ मार्च: मेजर १८२, मायक्रो ८४५२२ मार्च: मेजर २०२, मायक्रो ७६६शहरात दहा मार्चपर्यंत १६९ मेजर आणि ६०२ मायक्रो कंटेन्मेंट झोन होते. तर सद्यस्थितीत २१५ मेजर आणि ८७९ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.