जुन्नरमध्ये साधेपणाने श्रीगणेश विसर्जन मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:13 AM2021-09-21T04:13:12+5:302021-09-21T04:13:12+5:30
कोरोनाचे संकट कायम असल्याने, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत फुलांच्या वर्षावात, तसेच भक्तिमय वातावरणात सिद्धिविनायक गणेश मंदिरापासून टाळ-मृदंगाच्या ...
कोरोनाचे संकट कायम असल्याने, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत फुलांच्या वर्षावात, तसेच भक्तिमय वातावरणात सिद्धिविनायक गणेश मंदिरापासून टाळ-मृदंगाच्या गजरात पारंपरिक रथातून श्रीगणेशामूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. नगराध्यक्ष श्याम पांडे नगरसेवक नरेंद्र तांबोळी, मंडळाचे अध्यक्ष संदेश खत्री, उपाध्यक्ष मंदार ढोबळे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कल्याण पेठगणेशोत्सव मंडळाने विसर्जन
या मिरवणुकीसाठी पालखीतून श्रीगणेशाची मिरवणूक काढली व मूर्ती स्थापन केली, त्याच ठिकाणी विसर्जन केले. अध्यक्ष तेजस बोठे, उपाध्यक्ष साहिल गोसावी सभासद भगवान चौधरी, विनायक गोसावी, मनेश बुट्टेपाटील, अभिषेक शिंदे, ऋषिकेश रेंगडे, गणेश कर्मे, गणेश चौधरी, नरेश शहा, आशिष गोसावी, सूरज गायकवाड, आकाश फुले यावेळी उपस्थित होते.
तेली बुधवार पेठ, शंकरपुरा, लोणार आळी, भोई आळी, खालचा माळीवाडा, पणसुंबा पेठ, भाई कोतवाल चौक, परदेशपुरा पेठ, वरली आळी सराई पेठ, सदाबाजार पेठ, ब्राह्मण बुधवार पेठ, नेहरूबाजार मंडळांनी प्रतीकात्मक मिरवणूक काढत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विसर्जन केले.
--
कोट -१
बऱ्याच नागरिकांनी घरी फुलांनी सजविलेल्या टाक्या, बादल्या, विहीर यामध्ये विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. विसर्जन मिरवणूक जरी नसल्या, तरी प्रत्येक मंडळांसमवेत पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सहकार्य मोलाचे ठरले. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत कोठेही गर्दी दिसून आली नाही.
विकास जाधव, पोलीस निरीक्षक.