‘श्रीमंत योगी’नाटयाविष्काराने सिंधू नृत्यमहोत्सवाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 08:20 PM2018-03-03T20:20:32+5:302018-03-03T20:20:32+5:30

शास्त्रीय नृत्याचे वैभव, वैविध्य आणि नाविन्य रसिकांसमोर यावे या उद्देशाने प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक वैभव आरेकर व कथक नर्तक सुशांत जाधव यांच्या संकल्पनेतून शहरात सिंधू नृत्य महोत्सव होत आहे. ‘श्रीमंत योगी’ या नाट्याविष्काराने आज महोत्सवाला सुरुवात झाली.

'Sindhu Nritya Mahotsav start with 'Shrimant Yogi' drama | ‘श्रीमंत योगी’नाटयाविष्काराने सिंधू नृत्यमहोत्सवाला सुरूवात

‘श्रीमंत योगी’नाटयाविष्काराने सिंधू नृत्यमहोत्सवाला सुरूवात

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी महाराज आणि त्या काळातील सांस्कृतिक, सामाजिक चित्र कलाकारांनी उभे केले. ‘बीप महाराज की जय’ या लघुनाट्याचे सादरीकरणही या महोत्सवात करण्यात आले.   

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कर्मयोग, स्वराज्यारोहण, त्यांचा आंतरिक संघर्ष आणि त्या वेळची सामाजिक परिस्थिती? नाट्याविष्काराच्या माध्यमातून शनिवारी पुणेकरांनी अनुभवली..निमित्त होते सांख्य डान्स कंपनी आणि मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स यांच्या वतीने आयोजित सिंधू नृत्य महोत्सवातील ‘श्रीमंत योगी’ नाट्याविष्काराचे.      
शास्त्रीय नृत्याचे वैभव, वैविध्य आणि नाविन्य रसिकांसमोर यावे या उद्देशाने प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक वैभव आरेकर व कथक नर्तक सुशांत जाधव यांच्या संकल्पनेतून शहरात सिंधू नृत्य महोत्सव होत आहे. स्वत: वैभव आरेकर यांनी साकारलेल्या ‘श्रीमंत योगी’ या नाट्याविष्काराने आज महोत्सवाला सुरुवात झाली.
या नाट्याविष्कारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत अनेक गोष्टींचे सादरीकरण भरतनाट्यमच्या माध्यमातून उपस्थितांच्या समोर सादर करण्यात आले. यामध्ये मुख्यत: शिवाजी महाराज आणि त्या काळातील सांस्कृतिक, सामाजिक चित्र कलाकारांनी उभे केले. याबरोबरच शिवरायांच्या जन्माअगोदर राज्याची असलेली परिस्थिती, त्यांचा जन्म, स्वराज्याची शपथ, स्थापना, महाराजांचा राज्याभिषेक, त्यांचे सत्तारूढ होणे याबरोबरच त्यांचा आंतरिक व आध्यात्मिक संघर्ष या कलाकृतीत पाहायला मिळाला. मुख्यत: ‘कर्मयोगी’ शिवाजी महाराज दाखविण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला आहे. लयबद्ध सादरीकरण आणि उत्कृष्ट प्रकाशयोजना यांचा सुंदर मिलापाला रसिकांची भरभरुन दाद मिळाली.   याबरोबरच महेश वाळुंज यांच्या ‘बीप महाराज की जय’ या लघुनाट्याचे सादरीकरणही या महोत्सवात करण्यात आले.   

Web Title: 'Sindhu Nritya Mahotsav start with 'Shrimant Yogi' drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.