पुणे : बाणेर गावठाणातील प्रीमरोझ सोसायटी, दत्त पॅलेस, सनफ्लॉवर मॉल व सोसायटी या इमारतींमधील वीज तांत्रिक बिघाडामुळे रात्री १२ ते सकाळी १० गायब होत होती. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींच्या निवेदनाबाबत महावितरणच्या अधिका-यांनी तक्रारीच खोट्या असल्याची प्रतिक्रिया दिल्याने नागरिक हतबल झाले. तब्बल वर्षभर डीपीवरील वेलींचे जाळी काढण्याची विनंती दुर्लक्षित केली गेल्याने आणि डीपीमध्ये बिघाड झाल्याने सतत पंधरवडाभर नागरिकांचे हाल झाले.महावितरणच्या डीपीच्या खांबावर वेलींनी जाळे केल्याने व तांत्रिक कारणांमुळे वीज जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसामुळे वेली भिजल्यावर शॉर्ट सर्किट होऊन अनेक तास वीजपुरवठा गायब होत असे. ऐन परीक्षेच्या दिवसांमध्ये हा त्रास झाल्याने येथील नागरिकांमध्ये संताप होता. वीज गायब झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून रात्री झोप येणेही अवघड बनल्याचे एका रहिवाशाने नमूद केले.महावितरणच्या औंध कार्यालयाकडे ५ ते ६ हजार मीटर आणि १५ ते २० कर्मचारी आहेत. वीजबिल एखाद्याने भरलेले नसल्यास महावितरणला तत्काळ माहिती मिळण्याची व्यवस्था केली गेली आहे. वीजपुरवठा गायब झालेला असल्यास ते समजण्याची यंत्रणा मात्र नाही, याबद्दल नागरिकांनी खेद व्यक्त केला. बिल न भरल्यास तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्याची तत्परता दाखविणाºया महावितरणकडे रात्रीच्या वेळी कर्मचारीच नसल्याने नागरिकांना नाहक अंधारात बसावे लागले. वेली काढण्याबाबत वारंवार निवेदने, तक्रारी देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. गेल्या पंधरवड्यात रोज रात्री वीजपुरवठा गायब होत असे. विद्यार्थ्यांचे, कामावर लवकर जाणाºयांचे विजेअभावी पाणीपुरवठा नसल्याने हाल होत होते. महावितरणचा कर्मचारी बिघाड दुरुस्त करण्यासाठी कधी सकाळी सात, तर कधी दहा वाजता उगवत होता. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते.तीन सोसायट्यांच्या तक्रारीचे निवेदन औंध येथील महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आले. स्थानिक नगरसेवकांकडेही त्याची प्रत देण्यात आली. तथापि, महावितरणच्या अधिकाºयांनी या तक्रारीच खोट्या असल्याचा आरोप केला. सत्य जाणून घेण्याऐवजी, दोषनिवारण करण्याऐवजी खोटेपणाचे आरोप केले गेल्याने निवेदन घेऊन गेलेल्या नागरिकांना वाईट वाटले. तक्रारींचे लेखी अर्ज अधिकाºयांनी तपासून पाहिले पाहिजेत, अशी त्यांची मागणी आहे.महावितरणच्या अधिकाºयांनी नागरिकांच्या प्रश्नांबाबत किमान संवेदनशीलता तरी दाखवावी, अशी या रहिवाशांची अपेक्षा आहे. वीज गायब झाल्याने होणारे हाल अधिकाºयांनी जाणून घेतल्यास तक्रार करण्याची वेळच येणार नाही, असे नागरिकांनी सांगितले.बूरे दिनचा प्रत्ययडीपीवरील वेली काढल्या गेल्याने आठ दिवसांपासून या सोसायट्यांचा वीजपुरवठासुरळीत झाल्याने नागरिकांना किमान दिवाळी तरी साजरी करता आली. औंध महावितरण कार्यालयात रात्रपाळीसाठी कर्मचारी नसल्याने तब्बल १५ दिवस या नागरिकांना वैताग येऊन अच्छे दिनऐवजी बूरे दिनचा प्रत्यय आला. शासनात बदल होऊनही काहीही बदलले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विजेचा खोळंबा होऊनही येईना जाग!, बाणेरमधील तीन सोसायट्यांमधील परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 3:12 AM