पुणे : शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुलींना पैशाचे आमिष दाखवून सुरू असलेल्या वेशाव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून तुर्कमेन्सितानमधील मुलीसह एका भारतीय मुलीची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. कृष्ण सिंग, गणेश लंगडा, आयाम, युवराज, शिवा आणि सूरज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.कॅम्प परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय आणि परदेशी मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केले जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेला मिळाली. कृष्णा सिंग हा आपल्या साथीदार एजंटच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणच्या मुली वेश्याव्यवसायाला मिळवून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये त्यांच्या नावाने रूम घेत असे. त्यानंतर ग्राहकांशी संपर्क साधून रक्कम ठरवून त्यांना या मुलींकडे पाठवत असे. या मिळालेल्या माहितीची खातरजमा करून कॅम्प परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून एका तुर्कमेनिस्तानच्या मुलीसह एका भारतीय मुलीची सुटका करण्यात आली.ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, शीतल भालेकर, सचिन कदम, नामदेव शेलार, रमेश लोहोकर, राजेश उंबरे, कविता नलावडे, नीता येळे, गीतांजली जाधव, राजेंद्र कचरे, नितीन तेलंगे, प्रदीप शेलार, सुनील नाईक, सचिन शिंदे, रेवणसिद्ध नरोटे, सुप्रिया शेवाळे, रुपाली चांदगुडे, आणि सरस्वती कागणे यांनी केली.
पुण्यात वेश्या व्यवसाय चालवणा-या सहा जणांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 5:12 PM