पुणे- मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला भोंगे काढण्याचे आवाहन केले होते. मात्र ३ मे रोजी यासंदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते. यामध्ये मनसेचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे हे मात्र या सर्व गोष्टींपासून दूर असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते.
वसंत मोरे मनसेच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष सोडण्याबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा मी आजारी आहे, मी पक्ष सोडणार, अशा चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहेत. पण असं काहीच नाही. पक्षातील काही असंतुष्ट आत्मे माझ्या पक्ष सोडण्याबाबत सतत अफवा पसरवत असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
वसंत मोरे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, पक्षातील काही असंतुष्ट आत्मे माझ्या पक्ष सोडण्याबाबत सतत अफवा पसरवत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी पक्षातच आहे, आणि अशा लोकांपासून पक्षाला धोका असल्याचे आपण राज ठाकरे यांच्या कानावर घातले असल्याचे देखील वसंत मोरे यांनी सांगितले.
मी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बालाजी दर्शनाला गेलो होतो. अक्षय्य तृतीयेनिमित्ताने हे नियोजन केले होते. त्यामुळे मला आंदोलनात सहभागी होता आले नाही. परंतु माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते. एखादा सैनिक नसेल तर लढाई हरत नाहीत. त्यामुळे जर माझ्या नसल्याने विविध चर्चा होत असतील. तरी मी अजूनही राजमार्गावरच आहे आणि राजमार्गावरच राहणार असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
शहर कार्यालयात फिरकलो नाही-
मी पक्ष कार्यालयात गेलो नाही. मी नाराजी राज साहेबांसमोर मांडली आहे. शहरात मी सातत्याने १५ वर्षे फक्त मनसेचे काम केले. पक्षाला उभारी मिळवून दिली. परंतु कुठलंही विचार न करता माझे शहराध्यक्ष पद काढून घेतले. त्यानंतर साईनाथ बाबर शहराध्यक्ष बनवण्यात आले. तिकडे फटाके वाजवले गेले. त्यांनी उत्सव साजरा केला. पण माझ्याबद्दल कुठलंही विचार केला नाही. ही सगळी नाराजी मी राज साहेबांसमोर मांडणार आहे. वसंत मोरेंचं जे पोटात असत ते ओठावर असत. शहर म्हणून काय भूमिका करावी हे ते ठरवतील, मी माझ्य प्रभागात या सर्व गोष्टी केल्या आहेत. म्हणून पक्षासाठी काम करत राहिलो पण शहर कार्यालयात फिरकलो नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माझ्या प्रभागात नियम पाळले गेले
माझ्य प्रभागात एकूण ६ मशीद आहेत. त्यांच्या पदधिकाऱ्यांशी मी स्वात जाऊन बोललो आहे. त्यांनी मला सहकार्याची भूमिका दाखवली. आणि राज साहेबांच्या भूमिकेनंतर कायद्यप्रमाणे नियम पाळले आहेत.