भुयारी मार्गाची ध्वनी व कंपन चाचणी होणार, खांबावर बसला पुलाचा एक भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 06:19 AM2017-12-16T06:19:16+5:302017-12-16T06:19:23+5:30
शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोच्या ५ किमी भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यापुर्वी केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे महामेट्रोच्या वतीने लवकरच ध्वनी व कंपन चाचणी घेण्यात येणार आहे. रस्त्याच्या खाली तब्बल २८ मीटर खोल बोगदा खणून त्यातून मेट्रो जाणार आहे. शिवाजीनगरहून ते फडके हौद मार्गे ती पुढे स्वारगेटकडे निघेल.
पुणे : शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोच्या ५ किमी भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यापुर्वी केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे महामेट्रोच्या वतीने लवकरच ध्वनी व कंपन चाचणी घेण्यात येणार आहे. रस्त्याच्या खाली तब्बल २८ मीटर खोल बोगदा खणून त्यातून मेट्रो जाणार आहे. शिवाजीनगरहून ते फडके हौद मार्गे ती पुढे स्वारगेटकडे निघेल.
महामेट्रोच्या या कामाचे प्रमुख अभियंता गौतम बिºहाडे यांनी ही माहिती दिली. शिवाजीनगर ते स्वारगेट हा मेट्रोचा मार्ग भुयारी आहे. असा भुयारी मार्ग करण्यापूर्वी काही चाचण्या घेणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. त्या मार्गाच्या वर असणाºया इमारती, जुन्या वास्तू यांना कसलाही धोका होऊ नये, यासाठी ही चाचणी घेण्यात येत असते. त्यात काम सुरू असताना निर्माण होणारी कंपने किती परिणामकारक ठरू शकतील, हे तपासले जाते. तसेच काम करताना निर्माण होणाºया आवाजापासून त्रास होतो आहे किंवा नाही हेही पाहिले जाते. या चाचण्या करून त्यातील निष्कर्षाप्रमाणे काम करण्याच्या पद्धतीत बदल केले जात असतात. या क्षेत्रातील अत्यंत तज्ज्ञ व्यक्तींकडून ही चाचणी घेतली जात असते.
हा भुयारी मार्ग जमिनीत रस्त्यापासून तब्बल २८ मीटर खाली असेल. त्यामुळे वरील कोणत्याही इमारतीला कसलाही धोका होण्याची शक्यता नाही, असे बिºहाडे यांनी स्पष्ट केले. इतक्या खोलवर कोणत्याही इमारतीचा पाया येत नाही. तसेच जलवाहिन्या, सांडपाणी, मैलापाणी वाहून नेणारी व्यवस्था किंवा तारा वगैरे जमिनीपासून फार तर काही फूट खोलीवर असतात. त्यामुळे त्यांचीही तोडफोड होण्याचा काही विषय नाही, असे बिºहाडे यांनी सांगितले.
वनाज ते रामवाडी या मार्गाचा सुमारे ५ किमीचा भाग नदीपात्रातून जातो. त्याचे सुमारे ६० खांब नदीपात्रात असतील. नदीपात्रातील कामावरून हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल आहे. त्यांनी दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करूनच तिथे काम सुरू आहे, असे बिºहाडे यांनी सांगितले.
मेट्रोच्या रस्त्यामध्ये असणाºया खांबावरील मेट्रो धावणाºया पुलाचा एक भाग नाशिक फाट्याजवळच्या खराळवाडी येथे बसवण्यात आला. ४५ टनाचा हा भाग नाशिक फाट्यापासून पुढे एका खासगी जागेवर सुरू करण्यात आलेल्या कास्टिंग यार्डमध्ये तयार करण्यात आला. असे बरेच भाग तिथे तयार करण्यात आले आहे. पुलाचे खांब तयार होतील तसे ते आता त्यावर बसवण्यात येतील. २८ मीटर अंतरावर दोन खांब असतात व त्यामध्ये असे १२ ते १५ भाग असतात, अशी माहिती बिºहाडे यांनी दिली. वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा दोन्ही मार्गांचे काम जोरात सुरू असून येत्या महिनाभरात दोन्ही मार्गांच्या काही भागात खांब व त्यावरचा पुलाचा भाग बसवण्यात येणार आहे.