महर्षीनगर : राज्य परिवहन मंडळाने ऐन दिवाळीत केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवशांचे हाल व गैरसोय होत आहे. प्रवाशांची ही गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने खासगी वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली. मात्र या वाहतूकदारांकडून प्रवाशांची अक्षरश: लूट अन् पिळवणूक होत आहे. तिकीट दर तर वाढवलाच आहे, मात्र साहित्याचेही वेगळे दर आकारले जात असल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पंढरपूरसाठी ५०० रुपये द्यावे लागत असून काही ठिकाणी ४०० रू दर देऊन एजंट लोकांना १००रू द्यावे लागत होते. बारामती साठी ३५०रू. दर द्यावा लागत होता. बुधवारी सकाळी हा दर १००० रुपये पर्यंत द्यावा लागत होता. परंतु पोलिसांनी व राज्य परिवहन मंडळाच्या आधिकार्यांनी मध्यस्थी करून एसटीच्या दराप्रमाणे दर आकारुन वाहतूक करण्यास सांगितले. शहरातून बाहेर जाणार्यांची संख्या जास्त जरी असली तरी परतीचा प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे हा दर खासगी वाहतूकदारांकडून आकारण्यात येतो, असे खासगी वाहतूक व्यावसायीक तानाजी वाशिवले यांनी सांगितले.संपाच्या धर्तीवर मिळालेल्या परवानगीमुळे एसटी फलाटावर एसटीच्या जागी खासगी वाहने दिसत होती. त्यामुळे एजंट लोकांचा सुळसुळाटही दिसत होता. या संपामुळे सामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत असून शासनाला संपाची कल्पना दोन महिने आधी देऊनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राज्य सरकार व परिवहन मंडळाच्या भांडणामध्ये आम्हाला वेठीस धरले जात आहे, अशी भावना सामान्य प्रवाशांनी व्यक्त केली.
एसटीच्या जागी खासगी बसेस, प्रवाशांचे हाल मात्र संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 3:01 PM
प्रवाशांची ही गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने खासगी वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली. मात्र या वाहतूकदारांकडून प्रवाशांची पिळवणूक होत आहे.
ठळक मुद्देतिकीट दर तर वाढवलाच आहे, मात्र साहित्याचेही वेगळे दर आकारले जात असल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढएसटी फलाटावर एसटीच्या जागी खासगी वाहने दिसत होती. त्यामुळे एजंटांचाही सुळसुळाट