आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन स्थायी समितीच्या निवडी.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 06:38 PM2019-02-21T18:38:38+5:302019-02-21T18:40:37+5:30
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची राजकीय गणित लक्षात घेऊन गुरूवार (दि. २१) रोजी महापालिका मुख्यसभेत स्थायी समितीच्या आठ जागांसाठी निवड करण्यात आली.
पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची राजकीय गणित लक्षात घेऊन गुरूवार (दि. २१) रोजी महापालिका मुख्यसभेत स्थायी समितीच्या आठ जागांसाठी निवड करण्यात आली. भाजपकडून पुन्हा एकदा सुनील कांबळे यांना सदस्यत्व देण्यात आले असून, आरपीआय च्या हिमाली कांबळे यांना सदस्यत्व देण्यात आले आहे. याशिवाय हेमंत रासने, दीपक पोटे, प्रकाश ढोरे आणि राजेंद्र शिळीमकर या सहा सदस्यांची निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून महेंद्र पठारे आणि अशोक कांबळे यांना स्थायीवर संधी देण्यात आली .
भाजपचे सुनील कांबळे, मंजुषा नागपुरे, निलिमा खाडे, कविता वैरागे, राजा बराटे आणि आबा तुपे या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांच्या जागेवरील सहा सदस्यांची नियुक्ती झाली. यातील एक जागा आरपीआयला देण्यात आली असून आरपीआय तर्फे हिमाली कांबळे यांना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान गटनेते दिलीप बराटे आणि आनंद अलकुंटे यांचा कार्यकाळ संपल्याने अशोक कांबळे आणि महेंद्र पठारे यांची नावे समितीसाठी मुख्यसभेत जाहीर करण्यात आली.