स्टार ११७६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:15 AM2021-09-14T04:15:17+5:302021-09-14T04:15:17+5:30

अंगणवाडी सेविकांचा मोबाईल बंद, आता रेकॉॅर्डसाठी रजिस्टर खरेदीचा भुर्दंड लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाच्या महिला व बालकल्याण ...

Star 1176 | स्टार ११७६

स्टार ११७६

Next

अंगणवाडी सेविकांचा मोबाईल बंद, आता रेकॉॅर्डसाठी रजिस्टर खरेदीचा भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्या हायटेक व पेपरलेस करण्यासाठी मोठा गाजावाजा करत सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप केले खरे, पण गेल्या दोन अडीच महिन्यांपासून सर्व अंगणवाडी सेविकांचे मोबाईल बंद पडले आहेत. परंतु रेकॉर्ड अपटेड ठेवण्यासाठी आता सर्व सेविकांना स्वखर्चाने रजिस्टर खरेदी करून माहिती भरावी लागत आहे.

शासनाने अंगणवाडी सेविकांना विविध माहिती ऑनलाइन भरण्यासाठी मोबाईल हॅण्डसेट दिले होते. पुणे जिल्ह्यातील ४ हजार ३८८ अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले आहे. या मोबाईलमुळे खरं तर अंगणवाडी सेविकांचे काम वाढले आहे. ऑनलाइन हजेरी, ऑनलाइन सर्व काम यामुळे सध्या बंद आहे. परंतु यामुळे लिखाणकाम वाढले असून, ऑनलाइन काम सुरू झाले आहे.

-----

जिल्ह्यात एकूण अंगणवाडी : 4388

- मिनी अंगणवाड्या : 441

- अंगणवाडी सेविका : 3947

- मिनी अंगणवाडी सेविका : 441

- मोबाईल वाटप : 4388

- प्रशासनाकडे जमा मोबाईल: 4388

--------

मोबाईलवरून करावी लागतात ही सरकारी कामे

अंगणवाडी सेविकांना मोबाईल ॲपवर अंगणवाडीत येणाऱ्या सर्व मुलांची हजेरी भरणे, गरोदर माता, मुलांची माहिती देण्यासाठी वेळोवेळी गृहभेटी दिल्या जातात ही सर्व माहिती, पूरक पोषण आहाराची माहिती, लसीकरण सर्वांची माहिती मोबाईल ॲपवर भरावी लागते.

-------

मोबाईल ॲपवर अनेक अडचणी

मोबाईल दिल्यापासून अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणी येत आहे. मोबाईल माहिती भरत असताना हँग होणे, एखादा अर्जच डाऊनलोड न होणे यासारख्या अडचणी येत आहेत.

-------

ऑनलाइन काम आता रजिस्टरमध्ये

ऑनलाइन हजेरी घेणे, इतर माहिती, पोषण आहार माहिती आता मोबाईल फोन जमा केल्यामुळे ऑनलाइन काम बंद आहे. पण हे सर्व काम रजिस्टरमध्ये करावेच लागते.

- शुभांगी नवनाथ शेळके, अंगणवाडीसेविका, जुन्नर

--------

शासन निर्णयानुसार पुढील कारवाई

मोबाईल फोन हॅग होत असल्याचे सांगत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाईल फोन प्रशासनाकडे जमा केले आहेत. संपूर्ण राज्यातच ही परिस्थिती आहे. शासनाकडून आदेश येतील तशी अंमलबजावणी सुरू होईल.

- दत्तात्रय मुंडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी

Web Title: Star 1176

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.