प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:12 AM2021-01-03T04:12:51+5:302021-01-03T04:12:51+5:30
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी २४ डिसेंबर रोजी नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतचे आदेश जारी केले होते़ ...
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी २४ डिसेंबर रोजी नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतचे आदेश जारी केले होते़ मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पालकांनी दिलेली संमती पाहता त्याचे प्रमाण खूपच कमी होते़ ३२ टक्के पालकांची समंती शुक्रवारपर्यंत महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली होती़ तर, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार होऊ शकतो असेही दोन दिवसांपूर्वी सांगितले होते़ परंतु, प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन ४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात येत आहे़
--
चौकट
शाळा सुरू करण्याबाबत २८ डिसेंबर रोजी महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते़ तर, आजपर्यंत दोन-तीन वेळा शाळा सुरू करण्याबाबतचे नियोजन पुढे ढकलले गेल्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मुख्याध्यापक असोसिएशनची बैठकही पार पडली़ पण यात येऊ घातलेल्या बोर्डाच्या परीक्षांच्या दृष्टीने शाळा सुरू करण्याबाबत बैठकीत मागणी केली़ दरम्यान, क्षेत्रीय कार्यालयातील सहायक शिक्षकप्रमुख व सहायक शिक्षण अधिकारी यांनी प्रत्येक शाळांमध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पूर्ण झाल्याचे सांगितले आहे़ त्यानुसार सोमवारपासून माध्यमिकच्या म्हणजे ९ ते १२ चे वर्ग सुरू होणार आहेत़
- सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त पुणे महापालिका