पोटगीच्या आदेशानंतरही समुपदेशनातून ‘त्यांचा’ संसार सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 07:22 PM2018-09-29T19:22:54+5:302018-09-29T20:20:31+5:30

सासरी होत असलेल्या छळाला आणि पतीच्या वागण्याला कंटाळून अखेर पत्नी माहेरी गेले. पती काही केल्या तिला नांदवायला तयार नव्हता. दोघांचेही पटेनासे झाल्याने पत्नीने पोटगीचा दावा दाखल केला.

started her married life after giving maintenance order | पोटगीच्या आदेशानंतरही समुपदेशनातून ‘त्यांचा’ संसार सुरू 

पोटगीच्या आदेशानंतरही समुपदेशनातून ‘त्यांचा’ संसार सुरू 

googlenewsNext
ठळक मुद्देदोघेही उच्चशिक्षित:  पत्नीला नांदविण्यावरून झाले होते वाददरमहा १० हजार रुपये पोटगी आणि पाच हजार रुपये तक्रार अर्जाचा खर्च देण्याचे दिले होते आदेश

पुणे : सासरी होत असलेल्या छळाला आणि पतीच्या वागण्याला कंटाळून अखेर पत्नी माहेरी गेले. पती काही केल्या तिला नांदवायला तयार नव्हता. दोघांचेही पटेनासे झाल्याने पत्नीने पोटगीचा दावा दाखल केला. त्यानुसार पत्नीला दरमहा पोटगी देखील मिळू लागली. मात्र, त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी दोघांच्या वकिलांनी केलेल्या प्रयत्नामुळे आणि समुपदेशामुळे संपत आलेले नाते पुन्हा उभारी घेवू लागले आहे. 
    प्रितम आणि प्रमिला असे या दाम्पत्याचे नाव. दोघेही उच्चशिक्षत. प्रितम हा एका खासगी कंपनीत कामाला होता तर प्रमिला हाऊस वाईफ. एप्रिल २०१६ त्यांचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले. दोघेही एकुलते एक असल्याने पालकांनी त्यांना अगदी लाडात वाढवले. प्रितम हा खेड्यात वाढलेला होता. तर प्रमिला ही लहानपनापासूनच शहरातच राहिलेली. त्यामुळे दोघांच्या विचारात काहीसा फरक होता. लग्न झाल्यानंतर दोघांचेही पहिले काही दिवस आनंदात गेले. मात्र, प्रपंचाला सुरुवात झाल्यानंतर प्रमिलाचा सासरच्यांकडून मानसिक छळ होऊ लागला. घरातील कोणतीही वस्तू खराब झाली किंवा वाया गेल्यास ती माहेरहून आणायची असे प्रमिलाला सांगितले जाऊ लागले. सासरचा अजब त्रास तिला सहन होईना. त्यानंतर लग्नाच्या दोन महिन्यानंतर तिला सासरच्यांकडून घर सोडून जाण्यासाठी दबाव आणला जावू लागला. त्यामुळे नांदणे अशक्य झाल्याने शेवटी तिने माहेर गाठले. माहेरी गेल्यानंतर दोन ते तीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर तिच्या आई वडिलांनी कायदेशीर मदत घेण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी अ‍ॅड. मिनाक्षी डिंबळे यांच्यामार्फ त कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला.
       दोघांमधील वाद मिटविण्यासाठी दोघांच्याही कुटुंबियांच्या बैठकाही झाल्या. मात्र त्यातून काही मार्ग निघाला नाही. त्यात मी तिला नांदवणार नाही, या भूमिकेवर प्रतिम ठाम होता. त्यामुळे प्रमिलाने दाखल केलेल्या पोटगीच्या खटल्यावर सुनावणी सुरू झाली. त्यावेळी तिला दरमहा १० हजार रुपये पोटगी आणि पाच हजार रुपये तक्रार अर्जाचा खर्च देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश शैलजा सावंत यांनी दिले. त्यानंतर पोटगी वसूलीचा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र यादरम्यान डिंबळे यांनी पुन्हा दोघांचे सुर जुळविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. दोघांचे समुपदेश केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला. त्यानंतर वेगळे घर घेऊन  नव्याने संसार सुरू केला आहे. व्यवसायाचा एक भाग म्हणून एक घर आणि संसार वाचविता आले याचा आनंद असल्याची भावना अ‍ॅड. डिंबळे यांनी व्यक्त केली. 

Web Title: started her married life after giving maintenance order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.