पुणे: महानगर क्षेत्रातील वडकी गावांतर्गत ऐतिहासिक मस्तानी तलावाचे खोलीकरणाचे काम शनिवार( दि २८ एप्रिल) पासून सुरु करण्यात आले. तलाव खोलीकरणाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे महानगर आयुक्त किरण गित्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. १४ एकर क्षेत्रावर या तलावाची निर्मिती इसवी १७२० दरम्यान केली गेली. या तलावामध्ये पाणी साठा झाल्यास परिसरातील ४ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तलावाची खोली भरपूर असल्यामुळे घाटातून वाहून जाणारे पाणी तसेच पावसाळ्यात नदीतून वाहून जाणारे पाणी पंप करून तलावात सोडले जाऊ शकते. मस्तानी तलावात सुमारे ५०,००० ब्रास गाळ असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाने केला आहे.
इतिहासकालीन मस्तानी तलावाच्या खोलीकरणाला पीएमआरडीए कडून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 2:04 PM
१४ एकर क्षेत्रावर या तलावाची निर्मिती इसवी १७२० दरम्यान केली गेली. या तलावामध्ये पाणी साठा झाल्यास परिसरातील ४ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून खोलीकरणासाठी ३ कोटी निधीला मान्यता मस्तानी तलावाचा ५ कोटी निधी द्वारे पर्यटन केंद्र करणार