‘जनतेच्या हितासाठी राज्य सरकार ठरले अपयशी’
By admin | Published: August 31, 2016 01:16 AM2016-08-31T01:16:44+5:302016-08-31T01:16:44+5:30
‘‘राज्यातील भाजपा आणि मित्र पक्षाचे सैराट सरकार जनतेच्या रक्षणासाठी अपयशी ठरलेले आहे. या सरकारला वेळीच आळा घालणे काळाची गरज आहे
दौंड : ‘‘राज्यातील भाजपा आणि मित्र पक्षाचे सैराट सरकार जनतेच्या रक्षणासाठी अपयशी ठरलेले आहे. या सरकारला वेळीच आळा घालणे काळाची गरज आहे,’’ असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले.
दौंड येथील शिवाजी चौकात जनसंघर्ष यात्रेचे आगमन झाले होते. या वेळी जाहीर सभेत ते बोलत होते. जगताप म्हणाले, की भाजपा आणि मित्र पक्षाच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, ही दुर्दैवाची बाब आहे. वाढती महागाई आणि महिलांवरील अत्याचाराला जनता कंटाळली आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडी यांसारख्या सणांना निर्बंध घातले जात आहेत. या हुकुमशाही सरकारचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक गोष्टीला थापा मारण्याशिवाय या सरकारमधील राज्यकर्र्त्यांनी दुसरे काही केलेले नाही. या वेळी दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे, नंदुकाका जगताप, मुरली निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा शेख यांनी उपस्थितांचा सत्कार केला. या वेळी विवेक संसारे, संजय होले, फरिदा सय्यद, गणी सय्यद, बजरंग म्हस्के, अशोक फरगडे, अतुल जगदाळे, हरेश ओझा, अकबर शेख, तन्मय पवार उपस्थित होते. (वार्ताहर)