एकवेळ उपाशी राहा पण मुलांना शिकवा- रामराजे नाईक निंबाळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 11:35 PM2018-07-19T23:35:10+5:302018-07-19T23:35:30+5:30
स्पर्धेच्या यशाची कला मुलांच्या हाती दिली तर यश संपादन होते. एक वेळ उपाशी रहा पण मुलांना शिक्षण द्या.
वरवंड : स्पर्धेच्या यशाची कला मुलांच्या हाती दिली तर यश संपादन होते. एक वेळ उपाशी रहा पण मुलांना शिक्षण द्या. त्यांची आवड आहे त्या ठिकाणी पाठवा. दुष्काळी भगातील माणसांना कष्ट करावयाची तयारी असते. यामुळे ग्रामीण भागात शिक्षण चांगले मिळत आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
दौंड तालुक्यातील पडवी येथे नागरी सत्कार व विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. आयसीएससी बोर्डामध्ये ४९५ गुण मिळवत देशात तृतीय क्रमांक मिळवणा-या रेवती भरत शितोळे, बँकॉकमध्ये झालेल्या फर्स्ट एशिया तिरंदाजी चषक स्पर्धेमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलेल्या साक्षी राजेंद्र शितोळे हिचा सत्कार करण्यात आला.
यासोबत ॠतुजा गायकवाड, प्रज्ञा जगताप, प्रणाली बारवकर, प्रतिक्षा शितोळे, अर्चना शितोळे, प्रियंका शितोळे या विद्यार्थींनीचाही सत्कार करण्यात आला. रायगडचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, प्राचार्य डॉ. एल. के. शितोळे यांचाही सत्कार नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार रंजना कुल, भरत शितोळे, सरपंच राजेंद्र शितोळे, विजय सुर्यवंशी, नंदकुमार, जनंद्रे निर्मल कुमार देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी थोरात म्हणाले, या दोन्ही मुलींनी यश संपादन करीत देशाचे नाव मोठे केले आहे. प्रयत्न करा यश नकी मिळेल. आमदार कुल म्हणाले, प्रतिकुल परिस्थितीतून माणूस घडतो हे पडवीकडे पाहील्यास कळते.
>गावामध्ये सत्कार होणार हे कळल्यानंतर आनंद झाला. ग्रामीण भाग व शहरी भाग यामधील शिक्षणात मोठी तफावत आहे. आई व वडीलांनी इतरांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:बरोबर स्पर्धा करण्यास शिकवले.
- रेवती शितोेळे
>उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच यश संपादन करण्यासाठी कष्टाची गरज असते. यश मिळण्यासाठी गावाची व कुटूंबाचा आशिर्वाद असणे गरजेचे आहे. - साक्षी शितोळे