ठळक मुद्देएकूण ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरीउत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वारजे : कुडजे गावच्या हद्दीत विठ्ठल रखुमाई मंदिरात आज पहाटे (दि. २१) चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये मंदिरातील गरुड खांबाचा चांदीचा पत्रा अंदाजे किंमत ३२ हजार व देवाच्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या साधारण ५ हजार असा एकूण ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भट यांनी दिली. गावाकडील मंदिर असल्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही नव्हते. त्यामुळे बहुधा पोलीस तपासात मर्यादा येण्याची शक्यता आहे.