पुणे : लोहमार्ग दुरूस्तीच्या कामामुळे पुणे ते मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतुक विस्कळीत राहणार असल्याने डेक्कन क्वीनला मुंबईकडे जाताना कर्जत आणि ठाणे तर पुण्याकडे येताना दादर व ठाणे स्थानकावर तात्पुरते थांबे दिले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.रेल्वे प्रशासनाकडून सकाळी मुंबईकडे जाणारी प्रगती एक्सप्रेस तर दुपारची डेक्कन एक्सप्रेस रद्द केली आहे. तर इतर काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर गाड्यांना प्रवाशांची गर्दी होणार आहे. प्रगती एक्सप्रेस ही गाडी बहुतेक सर्व प्रमुख थांब्यावर थांबते. तर डेक्कन क्वीनला मुंंबईकडे जाताना केवळ लोणावळा व दादर हेच थांबे आहेत. तर येताना कर्जत व लोणावळ्यामध्ये ही गाडी थांबते. त्यामुळे ठाण्यामधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. यापार्श्वभुमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने डेक्कन क्वीनला दि. २६ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्याकडे येताना ही गाडी दादर, ठाणे, कर्जत, लोणावळा व शिवाजीनगर थांब्यावर थांबेल. तर मुंबईला जाताना लोणावळा, कर्जत ठाणे व दादर याठिकाणी थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
डेक्कन क्वीनला कर्जत, ठाण्यात थांबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 11:52 AM
रेल्वे प्रशासनाकडून सकाळी मुंबईकडे जाणारी प्रगती एक्सप्रेस तर दुपारची डेक्कन एक्सप्रेस रद्द केली आहे. तर इतर काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देडेक्कन क्वीनला मुंबईकडे जाताना कर्जत आणि ठाणे तर पुण्याकडे येताना दादर व ठाणे लोहमार्ग दुरूस्तीच्या कामामुळे पुणे ते मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतुक विस्कळीत राहणार