तारांच्या घर्षणाने ट्रॅक्टरवरील गवताला आग
By Admin | Published: December 22, 2016 01:34 AM2016-12-22T01:34:19+5:302016-12-22T01:34:19+5:30
पाईट येथील पापळवाडीमध्ये गवत घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मुख्य रस्त्यावर प्रमाणापेक्षा अधिक खाली आलेल्या विद्युत वाहक
पाईट : पाईट येथील पापळवाडीमध्ये गवत घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मुख्य रस्त्यावर प्रमाणापेक्षा अधिक खाली आलेल्या विद्युत वाहक तारांच्या घर्षणाने ट्रॅक्टर मिथिल गवतावर पडून पेट घेतला. सुदैवाने बाजूच्या ग्रामस्थांनी आवाज दिल्याने मोठी हानी टळली.
किसन डांगले हे बाळू शिंदे यांच्या ट्रॅक्टरमधून गवत घेऊन जात असताना पापळवाडी येथे एका ठिकाणी अत्यंत खाली आलेल्या विद्युतवाहक तारांचे घर्षण होऊन ठिणगी गवताच्या ट्रॅक्टरवर पडल्याने गवताने पेट घेतला. गवत पेटलेले असताना त्यामागे दुचाकी घेऊन येत असलेले कैलास दरेकर यांनी आवाज दिला. तसेच त्या ठिकाणी असलेले वनाजी पापळ, भानुदास दरेकर, बाळू पापळ, दरेकर, माऊली करंडे आदींनी तातडीने गवत खाली घेण्यास मदत केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळळा. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तेथून विद्युत वितरण कंपनीने अत्यंत धोकादायक पद्धतीने विद्युतवाहक तारा नेलेल्या आहेत. या ठिकाणी चाकण येथून पाईटकडे ३३ केव्ही लाईन आली असून, त्याखाली ११ के. ही थ्री एसटी लाईन गेली आहे, तर त्याखालून एल टी लाईन ओढण्यात आली आहे.(वार्ताहर)