...अाणि त्यांना मिळालं त्यांच्या हक्काचं मामाचं गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:28 PM2018-05-12T15:28:13+5:302018-05-12T15:28:13+5:30
अंघाेळीची गाेळी हा उपक्रम राबविणारे माधव पाटील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम राबवितात. या उपक्रमांतर्गत यंदा अहमदनगर येथील 20 मुलामुलींना ते पुण्याची सफर घडवत अाहेत.
पुणे : अहमदनगरच्या अकाेले तालुक्यातील अादिवासी भागातील 8 वी ते 10 वी इयत्तेत शिकणारी 20 मुलंमुली. साधं तालुक्याचं गाव सुद्धा त्यांना कधी पाहायला मिळालं नव्हतं. शिकण्याची, नवनवीन गाेष्टी, ठिकाणं पाहायची त्यांची दुर्दम्य इच्छा. परंतु परिस्थिती अाणि संधी दाेन्हीही कधी मिळाल्या नाही. या मुलांच्या अायुष्यात अाशेचा किरण अाता डाेकावताेय. कधीकाळी स्वप्नवत वाटणाऱ्या गाेष्टी ते अाज प्रत्यक्ष पाहतायेत. पुण्यातील अंघाेळीची गाेळी हा उपक्रम राबविणारे माधव पाटील गेल्या तीन वर्षांपासून मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम राबवत असून ग्रामीण भागातील मुलांना पुण्यात अाणून त्यांना पुण्याची सैर ते घडवतात. माधव पाटील यांच्या या उपक्रमातून अनेकांना अापल्या हक्काचं मामाचं गाव मिळालं अाहे.
यंदा अहमदनगरमधील अकाेले तालुक्यातील एका अादिवासी गावातील इयत्ता 8 वी ते 10 वी इयत्तेतील 20 मुलामुलींना माधव पाटील पुण्याला मामाच्या गावाला घेऊन अाले अाहेत. या मुलांसाठी माधव पाटील व त्यांचे सहकारी मामा हाेत त्यांना पुण्याची सैर घडवत अाहेत. गेल्या तीन वर्षांपासून उन्हाळाय्चा सुट्टीत ते हा उपक्रम राबवित असून अात्तापर्यंत विविध ठिकाणच्या मुलांना त्यांनी पुण्याची सैर घडवली अाहे. यंदाची मुलं ही अहमदनगरच्या विविध शाळांमधील अाहेत. 11 ते 16 मे दरम्यान या मुलांना पुण्यातील विविध वास्तू दाखविण्यात येणार अाहेत. त्यात शनिवारवाडा, लालमहाल, कात्रज उद्यान, सिंहगड, लाेणीकंद येथील राज कपुर स्टुडिअाे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रानडे इन्स्टिट्यूट, अायुका, फर्ग्युसन महाविद्यालय, चिंचवड येथील सायन्स पार्क, बर्ड व्हॅली अादींचा समावेश अाहे. पुण्यातील माेठमाेठ्या इमारती, रस्ते, गाड्या पाहून ही मुले हरकून जात अाहेत. स्वप्नवत वाटणाऱ्या गाेष्टी प्रत्यक्ष पाहताना त्यांच्या अानंदाला पारावार उरत नाही. त्यांचे अानंदी चेहरे पाहून माधव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनमध्ये समाधानाची भावना अाहे.
सध्या ही मुले फर्ग्युसन रस्त्यावरील विद्यार्थी सहायक समितीच्या वसतीगृहात राहत अाहेत. माधव पाटील यांना भाऊसाहेब जाधव यांचेही सहकार्य लाभले अाहे. पुण्यातील विविध ठिकाणांबराेबरच या मुलांना विविध मान्यवरांना एेकण्याची संधी सुद्धा उपलब्ध करुन देण्यात अाली अाहे. याबाबत बाेलताना माधव पाटील म्हणाले, ही मुले येथून परत जाताना नक्कीच माेठी स्वप्न बघतील. अाणि ती पुर्ण करण्यासाठी मनापासून शिक्षण घेतील. अनेक न पाहीलेल्या गाेष्टी या मुलांना येथे पाहायला मिळत अाहेत. त्यांना मिळणारा अानंद पाहून अाम्हीही खूप समाधानी अाहाेत.