पुणे : राज्याच्या विविध भागातून अायबीपीएस पीअाे परीक्षेसाठी अालेल्या विद्यार्थ्यांकडे ई-अाधारची संपूर्ण प्रिंट नसल्याच्या कारणाने त्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याचा प्रकार पुण्यतील नवले येथील युवान अायटी सेंटर येथील परीक्षा केंद्रावर घडला अाहे. चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही घटना घडली असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट अाहे. सरकारी बॅंकामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अायबीपीएसची परीक्षा घेतली जाते. पुण्यातील युवान अायटी सेंटर येथील परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांकडे ई अाधारकार्डची मागणी करण्यात अाली. विद्यार्थ्यांनी ई-अाधारकार्डच्या कलर प्रिंटचा अावश्यक असलेला भाग कापून अाणला हाेता. तर काहींकडे अाधारकार्ड हाेते. ई- अाधारकार्डचा अावश्यक भाग परीक्षा केंद्रावर दाखवला असता संपूर्ण ई-अाधारची प्रिंट असल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही असे विद्यार्थ्यांना सांगण्यात अाले. विद्यार्थी बाहेरगावावरुन अाले असल्याने अनेकांकडे अाधारकार्ड व्यतिरिक्त इतर कुठलेही अाेळखपत्र नव्हते. विद्यार्थ्यांनी विनवणी करुनही त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. ई-अाधारच्या प्रिंटवर येथे कापा अशी खून केलेली असते. त्याखालील भागच महत्त्वाचा असताे. तसेच त्यावर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती असते. असे असताना केवळ संपूर्ण प्रिंट नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात अाले. याबाबत बाेलताना शुंभागी घाेरपडे ही परीक्षार्थी म्हणाली, अाम्ही अायबीपीएसच्या परीक्षेसाठी सकाळी युवान अायटी सेंटरमध्ये अालाे हाेताे. अाम्ही ई अाधारकार्डच्या प्रिंटमधील महत्त्वाचा भाग कापून ताे लॅमिनेट करुन अाणला हाेता. त्यावर परीक्षार्थीची संपूर्ण माहिती असते. परंतु अाम्हाला ई अाधारकार्डची संपूर्ण प्रिंट अाणण्यास सांगितले. इतक्या कमी वेळात संपूर्ण प्रिंट अाणणे शक्य नव्हते. तसेच अाम्ही बाहेरगावावरुन अालाे असल्याने अामच्याकडे अाधारकार्ड व्यतिरिक्त इतर कुठलाही पुरावा नव्हता. परीक्षेला बसू न दिल्याने अामचे संपूर्ण वर्ष वाया गेले अाहे.
मनाेज पांचाळ, म्हणाला, मी लातूरहून ही परीक्षा देण्यासाठी अालाे हाेताे. अामच्याकडे अाधारकार्ड असताना ई-अाधारची संपूर्ण प्रिंटची मागणी करण्यात अाली. अाम्ही विनवणी करुनही अाम्हाला प्रवेश देण्यात अाला नाही. वास्तविक अाधारकार्ड असताना ई-अाधारच्य संपूर्ण प्रिंटचा अाग्रह करणे चुकीचे अाहे. परंतु अामचे काहीही एेकून घेण्यात अाले नाही.
दरम्यान या संदर्भात युवान अायटी सेंटरशी संपर्क हाेऊ शकला नाही.