इंजिनिअरिंगचे विद्यार्थी दुचाकीचोर, विमानतळ पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 02:52 AM2018-07-10T02:52:44+5:302018-07-10T02:53:05+5:30

मौजमजेसाठी दुचाकी वाहनांची शिताफीने चोरी करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या ६ विद्यार्थ्यांना विमानतळ पोलिसांनी नुकतीच अटक केली. शहर व इतर ठिकाणी केलेल्या विविध ७ वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील १८ दुचाकी विमानतळ पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत.

 The students of engineering students, wheelchairs, airport police action | इंजिनिअरिंगचे विद्यार्थी दुचाकीचोर, विमानतळ पोलिसांची कारवाई

इंजिनिअरिंगचे विद्यार्थी दुचाकीचोर, विमानतळ पोलिसांची कारवाई

Next

विमाननगर - मौजमजेसाठी दुचाकी वाहनांची शिताफीने चोरी करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या ६ विद्यार्थ्यांना विमानतळ पोलिसांनी नुकतीच
अटक केली. शहर व इतर ठिकाणी केलेल्या विविध ७ वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील १८ दुचाकी विमानतळ पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत.
या प्रकरणी सोहेल शेख (वय २०, रा. लोहगाव), आदेश ऊर्फ विनायक रामचंद्र शिंदे (वय १९, रा. परभणी), आशिष सुनील सरदार (वय २० रा. मलकापूर, जि. बुलडाणा), माधव कृष्ण गोपाल प्रसाद सिंह (वय १९, रा. वेळूसराय, बिहार), किरण खैरनार (वय २०, रा. नाशिक) व सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय २३, रा. आळंदी) यांना अटक केली. सोबत्यांकडून शहर व ग्रामीण परिसरातून चोरलेल्या विविध १८ दुचाकी, असा सुमारे २१ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी सांगितले, की दुचाकी वाहनचोरीचे गुन्हे रोखण्यासाठी विमानतळ पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार लोहगाव परिसरात गस्त करीत असताना पोलीस नाईक सारंग दळे व दीपक सानप यांना सोहेल शेख हा एका दुचाकीवर संशयास्पदरीत्या मिळून आला. त्यांच्याजवळ असणाºया केटीएम या दुचाकीबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अधिक तपासात ही दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याने इतर साथीदारांच्या मदतीने शहरात वाहनचोरीचे अनेक गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले. सोहेल व त्याचे इतर साथीदार शहरातील एका नामवंत महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत.
पोलीस उपायुक्त दीपक साकोरे सहायक पोलीस आयुक्त गणेश
गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, गुन्हे निरीक्षक रमेश साठे, सहायक पोलीस निरीक्षक एम. आर. खोकले, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, उपनिरीक्षक दीपक जाधव, पोलीस कर्मचारी संभाजी तांबे, मोहन काळे, विजय सावंत, संजय आडारी, सचिन भिंगारदिवे, राहुल मोरे, विशाल गाडे, विनोद महाजन, किरण पड्याळ, प्रशांत कपूर, प्रदीप राऊत, दीपक सानप, वसीम सय्यद, अजय विधाते, स्वप्निल जाधव, विकास शिंदे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने या वाहनचोरांच्या टोळीचा गुन्हा शिताफीने उघडकीस आणला. वाहनचोरीच्या या गुन्ह्याचा पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

वाहनचोरीचे एकूण १७ गुन्हे उघडकीस
विमानतळ पोलिसांनी केलेल्या तपासात हे सर्व विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतात. मौजमजेसाठी यांनी या दुचाकी चोरल्या असून बनावट किल्लीने तसेच हँडललॉक तोडून ते या दुचाकी चोरत असत. त्यांच्याकडून विमानतळ, डेक्कन, विश्रांतवाडी, चंदननगर, दत्तवाडी, वानवडी, विश्रामबाग, खडक, स्वारगेट, कोथरूड यासह आळंदी पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे एकूण १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.

मौजमजेसाठी ते चोरी करायचे
मौजमजेसाठी शहर व ग्रामीण पोलीस हद्दीतून अनेक दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. या गुह्यातील आरोपींना विमानतळ पोलिसांनी शिताफीने वेगळ्या परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून एकूण १७ गुन्ह्यांमधील १८ दुचाकी, असा २१ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये ४ बुलेट, ४ केटीएम, ३ पल्सर, प्रत्येकी १ करिज्मा, युनिकॉर्न, अ‍ॅक्टिव्हा, ज्युपिटर, सीडी डिलक्स व डॉमिनर अशा एकूण १८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Web Title:  The students of engineering students, wheelchairs, airport police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.