प्रॉक्टर्ड परीक्षेची विद्यार्थ्यांना धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:10 AM2020-12-08T04:10:25+5:302020-12-08T04:10:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मंगळवारपासून (दि.८) प्रथम वर्ष ते अंतिम पूर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रॉक्टर्ड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मंगळवारपासून (दि.८) प्रथम वर्ष ते अंतिम पूर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रॉक्टर्ड पध्दतीने परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी धास्ती घेतली आहे. परंतु, विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. परीक्षेतील सजगतेसाठी विद्यापीठाने ‘प्रॉक्टर्ड’चा पर्याय स्वीकारला आहे, असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
विविध शैक्षणिक संस्थांकडून व प्रवेश पूर्व परीक्षांसाठी प्रॉक्टर्ड पध्दतीचा वापर केला जातो. त्यात व्हिडिओ प्रॉक्टर्ड, इमेज प्रॉक्टर्ड आणि अॅक्टिव्हिटी प्रॉक्टर्ड परीक्षा घेतल्या जातात. विद्यापीठातर्फे केवळ इमेज पॉक्टर्ड पध्दतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला फ्रंट कॅमेरा असलेले इलेक्टॉनिक उपकरण आवश्यक आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या कॅमेराला एकच विद्यार्थी दिसणे अपेक्षित आहे. ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या कॅमेरा समोर एका पेक्षा जास्त व्यक्ती अल्यास सॉफ्टवेअरकडून फोटो काढून घेतले जातात. तसेच एक ते दोन मिनिटांनी फोटो काढून घेतले जात असल्याने परीक्षेचे गांभीर्य वाढणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे विद्यापीठाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
---
व्हिडिओ प्रॉक्टर्ड परीक्षेसाठी ब्रण्ड विर्डथ जास्त लागते. त्यामुळे व्हिडिओ प्रॉक्टर्ड परीक्षा घेणे सोपे नाही. या उलट इमेज प्रॉक्टर्ड परीक्षा घेणे सहज शक्य आहे. विद्यापीठाकडून आता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत. परिणामी विद्यापीठाला परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचे पुरावे जमा करता येतील. अॅक्टोव्हिटी प्रॉक्टर्ड मध्ये विद्यार्थी परीक्षा देताना मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावर परीक्षे ऐवजी इतर कोणती विण्डो ओपन करतो का? हे तपासले जाते.
--
सजगतेच्या दृष्टीकोनातून विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पध्दतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक ते दोन मिनिटांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढले जातील. परंतु, योग्य मार्गाने परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ