सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांनाही मिळावा प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:12 AM2021-01-21T04:12:18+5:302021-01-21T04:12:18+5:30
कोरोनाच्या भितीमुळे प्रवेश पूर्व परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष सुरेश ...
कोरोनाच्या भितीमुळे प्रवेश पूर्व परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष सुरेश जैन, शहर काँग्रेस कमिटीचे संघटक सचिव अभिजित महामुनी, भारतीय जनता पक्षाचे शैलेंद्र बडदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गांधी, अजिंक्य पालकर, तोसिफ शेख, मयूर उत्तेकर यांनी राज्यपालांना निवेदन दिले.
अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेत शून्य गुण किंवा एक गुण मिळाला तरी विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतो. त्यामुळे प्रवेश परीक्षा ही केवळ गुणवत्ता ठरविण्याचे मापक आहे.परिनामी महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश पूर्व परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास कोणतीही अडचण येत नाही. परदेशी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाबाबत कोणतीही अट घालण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश द्यावा. तसेच ‘एआयसीटीई्’ने शैक्षणिक संस्थांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश पूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे परिपत्रक काढले आहे. मात्र, राज्य शासनाने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी राज्यपाल कोश्यारी यांनी याबाबत निवेदन दिले.