सुबोध मोहितेंची तिसरी निवड ‘राष्ट्रवादी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:12+5:302021-06-26T04:09:12+5:30
रामटेक मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर मोहिते पहिल्यांदा खासदार झाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून न घेता आल्याने त्यांनी शिवसेना सोडल्याचे ...
रामटेक मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर मोहिते पहिल्यांदा खासदार झाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून न घेता आल्याने त्यांनी शिवसेना सोडल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र कॉंग्रेसकडून त्यांना रामटेक लोकसभा मतदारसंघ पुन्हा जिंकता आला नाही. विधानसभेलाही त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही काळ ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते.
अखेरीस त्यांनी पुण्यात पवार यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी’त प्रवेश करत तिसरा पक्ष निवडला आहे. मोहिते यांच्याबद्दल पवार म्हणाले की, मोहितेंची लोकसभेतील कामगिरी पाहिली आहे. नवीन लोकांनी चांगले काम केले की त्यांचे कौतुक करण्याची ‘सिनियर्स’ची भावना हवी. मोहिते ‘राष्ट्रवादी’त चांगले काम करतील. मोहिते म्हणाले, “पवार हे ‘अनडाऊटेबल हिरो ऑफ इंडियन पॉलिटिक्स’ आहेत. आता माझे उर्वरित आयुष्य त्यांच्याबरोबर काढणार आहे.”