गावडे विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:13 AM2021-08-23T04:13:33+5:302021-08-23T04:13:33+5:30
या परीक्षेत पायल काणे ही द्वितीय तर जिल्ह्यात ११ वी आली आहे. त्याचबरोबर संस्कृती साबळे, गौरी किऱ्हे या विद्यार्थिनी ...
या परीक्षेत पायल काणे ही द्वितीय तर जिल्ह्यात ११ वी आली आहे. त्याचबरोबर संस्कृती साबळे, गौरी किऱ्हे या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत. या पात्र विद्यार्थ्यांस शासनाकडून दरवर्षी १२ हजार रूपये स्काॅलरशिप मिळणार आहे. ही स्काॅलरशिप विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होत असते. दरवर्षी विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाळेत असताना न चुकता ऑनलाईन नूतनीकरण फाॅर्म त्या त्या शाळेतून भरणे आवश्यक आहे. यापूर्वी या विद्यालयातून शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या परंतु अद्यापही काही वर्षाच्या स्काॅलरशिप खात्यावर जमा न झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य आर.बी.गावडे यांनी केले आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे अभिनंदन माजी आमदार पोपटराव गावडे, संस्थेचे सचिव राजेंद्र गावडे, माजी सरपंच दामू घोडे, माजी उपसरपंच पै. तुकाराम ऊचाळे यांनी केले.
२२ टाकळी हाजी